वणीत आयडिया मोबाईल टॉवरच्या जनरेटर लाग; चार लाखाचे नुकसानीचा प्राथमिक अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 22:35 IST2021-04-03T22:34:49+5:302021-04-03T22:35:00+5:30

शनिवारी रात्री या जनरेटरला अचानक आग लागली. पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण केले.

Wani Idea Mobile Tower Generator Lag; Preliminary estimate of loss of Rs four lakh | वणीत आयडिया मोबाईल टॉवरच्या जनरेटर लाग; चार लाखाचे नुकसानीचा प्राथमिक अंदाज

वणीत आयडिया मोबाईल टॉवरच्या जनरेटर लाग; चार लाखाचे नुकसानीचा प्राथमिक अंदाज

वणी (यवतमाळ) : शहरातील मध्यवस्तीत असलेल्या विराणी चौक परिसरात  आयडीया कंपनीच्या टाॅवरच्या जनरेटरला भीषण आग लागली. या आगीत जनरेटर जळून खाक झाले. ही घटना शनिवारी रात्री ९.२० वाजताच्या सुमारास घडली. विराणीचौक परिसरामध्ये बँक ऑफ बडोदालगत आयडिया कंपनीचे मोबाईल टॉवर आहे. त्याचे जनरेटर बँकेच्या मागे दाट वस्तीत एका घरात ठेवले होते.

शनिवारी रात्री या जनरेटरला अचानक आग लागली. पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच,त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठले. दाट वस्ती असल्याने अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी पोहचण्यासाठी थोडा विलंब झाला. मात्र आगीवर लगेच नियंत्रण मिळविण्यात यश आले. आहे या आगीमुळे शहरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. या आगीत अंदाजे चार लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Web Title: Wani Idea Mobile Tower Generator Lag; Preliminary estimate of loss of Rs four lakh