शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वणीतील पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST

दरम्यान, मंगळवारी दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी वणीत येऊन प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी केली. तसेच व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत वणीचे एसडीओ डॉ.शरद जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, ठाणेदार वैभव जाधव यांच्यासह प्रशासनातील अनेक अधिकारी उपस्थित होते. वणी-वरोरा मार्गावरील साई दरबार व शांती पार्क भागात तीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्यामुळे या क्षेत्राला प्रतिबंधीत करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे१० जण निगेटिव्ह : उर्वरित अहवालांकडे लक्ष, पोलीस अधीक्षक वणीत दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : मुंबईहून वणी शहरात आलेल्या दोघांसह वणीतील एकाला कोरोनाची लागण झाल्याची बाब उघड झाली. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील कोव्हिड सेंटरमध्ये दाखल केलेल्या ५३ जणांपैकी पुन्हा दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रूग्णांची संख्या आता पाच झाली आहे. त्यामुळे वणीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. १० जणांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत.दरम्यान, मंगळवारी दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी वणीत येऊन प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी केली. तसेच व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत वणीचे एसडीओ डॉ.शरद जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, ठाणेदार वैभव जाधव यांच्यासह प्रशासनातील अनेक अधिकारी उपस्थित होते. वणी-वरोरा मार्गावरील साई दरबार व शांती पार्क भागात तीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्यामुळे या क्षेत्राला प्रतिबंधीत करण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी या क्षेत्राची पाहणी करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.१२ जून रोजी मुंबईवरून एक कुटुंब वणीत आले होते. सर्वप्रथम त्या कुटुंबातील एका दाम्पत्याला तसेच या दाम्पत्याच्या नात्यातीलच वणीत राहणाºया एकाला कोरोना झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. यादरम्यान प्रशासनाने तातडीने हालचाली करून सदर व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्यांची माहिती घेऊन ५३ जणांना परसोडा येथील कोव्हिड सेंटरमध्ये क्वारंटाईन केले. यातील पुन्हा दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता रूग्णांची संख्या पाच झाली आहे, अशी माहिती वणीचे एसडीओ शरद जावळे यांनी दिली. सुरूवातीला १५ जणांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील १० जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.तरंगतुषार वारे यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या