क्वारंटाईनचा शिक्का मिटवून शहरात वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST2020-06-09T05:00:00+5:302020-06-09T05:00:14+5:30
सोशल डिस्टन्सिंग हा शब्द तर केवळ नावापुरताच राहिला आहे. दुकानात ग्राहकांची गर्दी झाल्यास दंड बसू शकतो. परंतु जोपर्यंत पोलीस जाऊन धमकविणार नाही, तोपर्यंत दुकानदार व ग्राहक स्वत:हून याचे पालन करीत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, खर्रा आदींचे सेवन करणे व थुंकण्यास मनाई आहे.

क्वारंटाईनचा शिक्का मिटवून शहरात वावर
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : कोरोना या अतिसंसर्गजन्य रोगाची साथ झपाट्याने पसरत आहे. शहरात प्रशासनातर्फे अनेकांना होम क्वारंटाईन करून त्यांच्या हातावर शिक्का मारण्यात आला आहे. मात्र अशा नागरिकांचा शहरात खुलेआम वावर सुरू असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत आहे.
सोशल डिस्टन्सिंग हा शब्द तर केवळ नावापुरताच राहिला आहे. दुकानात ग्राहकांची गर्दी झाल्यास दंड बसू शकतो. परंतु जोपर्यंत पोलीस जाऊन धमकविणार नाही, तोपर्यंत दुकानदार व ग्राहक स्वत:हून याचे पालन करीत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, खर्रा आदींचे सेवन करणे व थुंकण्यास मनाई आहे. शहरातील मराठी शाळेच्या क्रीडा संकुलामध्ये अनेकजण कालमर्यादेपेक्षा जास्त वेळ एकत्र जमतात. तेथे नशापान केले जात आहे. तसेच जागोजागी खºर्याच्या पिचकाऱ्या मारल्या जात असल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. शहरात पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यातून एक हजार ९५२ जण शहरात आले आहेत. यात मजूर, विद्यार्थी व कामाकरिता बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या कुटुंबियांचा समावेश आहे. या सर्वांना शासनाच्या नियमानुसार तपासणी करून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईचा शिक्का मारला. तसेच त्यांना १४ दिवस घरातच राहण्याचे सूचविले होते. मात्र अनेकजण आपल्या हातावरील शिक्का मिटवून मुक्तपणे शहरात वावर करित आहे.