अवघ्या नऊ दिवसात ‘वेटींग’ आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 05:00 IST2020-12-07T05:00:00+5:302020-12-07T05:00:07+5:30
वाढोणाबाजार आणि खैरी येथे सीसीआयला या काळात समाधानकारक प्रतिसाद आहे. राळेगावला त्या तुलनेत कमी प्रतिसाद आहे. राळेगाव व वाढोणाबाजार येथे सुरू असलेेले खासगी खरेदी केंद्र आणि शेतकऱ्यांना नगदी पैशांची गरज असल्यामुळे शेतकरी खासगीकडे वळले. दिवाळीपूर्वी सीसीआयच्या कापूस खरेदीची शेतकरी प्रतीक्षा करीत हाेते. पण आता दर वाढतील या अपेक्षेने कापूस विक्रीस त्यांनी ब्रेक दिला असल्याचे सांगितले जाते.

अवघ्या नऊ दिवसात ‘वेटींग’ आटोक्यात
लाेकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीने राळेगाव केंद्रावर आठ हजार ६३८, वाढोणाबाजार केंद्रावर तीन हजार ५४६, खैरी केंद्रावर चार हजार ९६१ याप्रमाणे २५ हजार नऊ शेतकऱ्यांची नोंदणी सीसीआयला कापूस विक्री करण्याकरिता केली होती. १६ नोव्हेंबर रोजी सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाली. अवघ्या नऊ दिवसात या सर्व शेतकऱ्यांना कापूस विक्रीकरिता आणण्याचे संदेश गेले. या नऊ दिवसात २५ हजार क्विंटल कापूस शेतकऱ्यांनी विकला.
वाढोणाबाजार आणि खैरी येथे सीसीआयला या काळात समाधानकारक प्रतिसाद आहे. राळेगावला त्या तुलनेत कमी प्रतिसाद आहे. राळेगाव व वाढोणाबाजार येथे सुरू असलेेले खासगी खरेदी केंद्र आणि शेतकऱ्यांना नगदी पैशांची गरज असल्यामुळे शेतकरी खासगीकडे वळले. दिवाळीपूर्वी सीसीआयच्या कापूस खरेदीची शेतकरी प्रतीक्षा करीत हाेते. पण आता दर वाढतील या अपेक्षेने कापूस विक्रीस त्यांनी ब्रेक दिला असल्याचे सांगितले जाते.
शेतकऱ्यांची द्विधा मानसिकता
शेतकरी एकीकडे भाव वाढतील या अपेक्षेने कापूस विक्री करण्यास थांबले आहेत, तर दुसरीकडे खासगीत पाच हजार ५०० रुपयांच्या जवळपास दरात आपला कापूस विकून मोकळे होत आहे. प्रती क्विंटल सरासरी ३०० रुपये क्विंटलप्रमाणे प्रत्येक गाडीवर पाच-सहा हजार रुपयांचे नुकसान करून घेत असल्याने त्यांच्यातील द्विधा मानसिकता दिसून येते. खासगीतही अनेक शेतकरी दुसऱ्या आठवड्यात पैशाचा चुकारा नेत असताना ते स्वत:चे नुकसान का करून घेत आहे, हा प्रश्नच आहे. हंगाम सुरू हाेवून महिनाभर तर सीसीआयला १५ दिवस झालेत. प्रत्येक केंद्रावर दररोज ५० ते ७५ हजार वाहने खासगी व सीसीआयकरिता येत आहे. अत्यल्प आवक अस्वस्थ करणारी आहे.
सीसीआयकडून पाच हजार ८२५ रुपये दर दिला जातो. चुकारेही पाचव्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. सीसीआयची कापूस खरेदी आता सर्वांकरिता पूर्णत: खुली झाली आहे.
- उमेश डाबेराव,
खरेदी प्रतिनिधी, सीसीआय, राळेगाव