वाघापूरचे नाना-नानी पार्क बनले टवाळखोरांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST2019-12-25T05:00:00+5:302019-12-25T05:00:08+5:30

नाना-नानी पार्क टवाळखोरांचा अड्डा बनले आहे. त्यांना हटकणाऱ्यांवरच चाल केली जाते. या प्रकारात एखादी गंभीर घटना होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी नगरपरिषदेकडे तक्रार करून याठिकाणी सुरक्षा रक्षक देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Waghapur's Nana-Nani Park becomes a Twilight Park | वाघापूरचे नाना-नानी पार्क बनले टवाळखोरांचा अड्डा

वाघापूरचे नाना-नानी पार्क बनले टवाळखोरांचा अड्डा

ठळक मुद्देनगर परिषदेकडे तक्रार : सुरक्षा रक्षक व वेळेचे बंधन पाळण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लहान मुलांना खेळण्या-बागडण्यासाठी आणि नागरिकांना विरंगुळ्यासाठी तयार करण्यात आलेले वाघापूर येथील नाना-नानी पार्क टवाळखोरांचा अड्डा बनले आहे. त्यांना हटकणाऱ्यांवरच चाल केली जाते. या प्रकारात एखादी गंभीर घटना होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी नगरपरिषदेकडे तक्रार करून याठिकाणी सुरक्षा रक्षक देण्याची मागणी करण्यात आली आहे.
नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.१५ मध्ये येत असलेल्या चितळकर ले-आऊट, राजस्व कॉलनी याठिकाणी हा नाना-नानी पार्क तयार करण्यात आला आहे. पार्क निर्मितीला मूठमाती मिळाली आहे. अल्पवयीन मुला-मुलींनी या पार्कला टवाळखोरीचा अड्डा बनविला आहे. अशोभनीय वर्तनही याठिकाणी केले जात आहे. यातूनच हाणामारीचे प्रकारही झालेले आहेत. परिसरातील नागरिकांनी येऊन टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न जीवावर बेतण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
रात्री उशिरापर्यंत या पार्कमध्ये मुले-मुली एकांत शोधण्याचेही प्रकार घडत आहे. एवढेच नव्हे तर मद्य शौकिनांनीही दारूचा गुत्ता बनविला आहे. ही बाब लोहारा पोलिसांना दूरध्वनीद्वारे वारंवार कळविण्यात आली. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. नाना-नानी पार्कमध्ये घडत असलेल्या प्रकारामुळे शांतता व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. याठिकाणी २४ तास सुरक्षा रक्षक देण्यात यावा, पोलीस गस्त वाढवावी, पार्क उघडे ठेवण्यास मर्यादा असावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. परिसरातील नगरसेवकांनाही मागण्यांचे निवेदन सादर केले.

Web Title: Waghapur's Nana-Nani Park becomes a Twilight Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.