यवतमाळात ‘एमएलसी’साठी ३१ जानेवारीला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 21:15 IST2020-01-03T21:15:22+5:302020-01-03T21:15:31+5:30
यवतमाळ : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम शुक्रवारी जाहीर झाला. त्यानुसार ३१ जानेवारीला मतदान घेतले ...

यवतमाळात ‘एमएलसी’साठी ३१ जानेवारीला मतदान
यवतमाळ : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम शुक्रवारी जाहीर झाला. त्यानुसार ३१ जानेवारीला मतदान घेतले जाणार आहे. ७ जानेवारीपासून नामांकन दाखल करता येणार आहे. १५ जानेवारीला नामांकनाची छाननी, तर १७ जानेवारीला नामांकन परत घेता येणार आहे. ३१ ला सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळात मतदान होईल. या निवडणुकीची मतमोजणी ४ फेब्रुवारीला होणार आहे.
यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूमपरांडा मतदारसंघातून २०१९ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत निवडून आले. त्यामुळे त्यांची ही जागा रिक्त झाली. त्या जागेसाठी आता ३१ जानेवारीला मतदान घेतले जाईल. प्रा. तानाजी सावंत या जागेवर आपले ज्येष्ठ बंधू प्रा. शिवाजी सावंत यांना रिंगणात उतरविणार असल्याचे बोलले जाते.
या मतदारसंघासाठी जिल्ह्यातूनही अनेकांनी मोर्चेबांधणी चालविली आहे. पश्चिम विदर्भातील एका माजी मंत्र्याची भगिनीसुद्धा या जागेसाठी प्रयत्नरत असल्याचे सांगितले जाते.