वृत्तपत्र विक्रेता संस्थेची वृद्धाश्रमाला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 22:48 IST2017-10-01T22:46:47+5:302017-10-01T22:48:11+5:30
जिल्हा वृत्तपत्र विके्रता कल्याणकारी संस्थेतर्फे उमरी पठार (ता.आर्णी) येथील दोला महाराज वृद्धाश्रमाला एलईडी व डिश भेट देण्यात आली.

वृत्तपत्र विक्रेता संस्थेची वृद्धाश्रमाला भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा वृत्तपत्र विके्रता कल्याणकारी संस्थेतर्फे उमरी पठार (ता.आर्णी) येथील दोला महाराज वृद्धाश्रमाला एलईडी व डिश भेट देण्यात आली. वृद्धाश्रमाचे संस्थापक शेषराव डोंगरे यांना या वस्तू सुपुर्द करण्यात आल्या.
वृत्तपत्र विक्रेता संस्थेचे अध्यक्ष अशोक शिंदे यांच्यासह सदस्यांनी वृद्धाश्रमातील समस्या जाणून घेतल्या. याठिकाणी असलेल्या वृद्ध महिला, पुरुष आदींची चौकशी केली. यानंतर छोटेखानी कार्यक्रमात अशोक शिंदे यांचा शेषराव डोंगरे यांनी सत्कार केला. डोंगरे यांचाही सत्कार वृत्तपत्र विक्रेता संस्थेतर्फे करण्यात आला. सामाजिक जाणिवेतून संस्थेतर्फे वृद्धाश्रमाला या वस्तू भेट देण्यात आल्या. यावेळी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संस्थेचे सचिव संतोष शिरभाते, राहुल वानखडे, नितीन भोयर, सतीश बढाये, श्रीपाद तोटे, सचिन कदम, संजय गज्जलवार, रवींद्र चव्हाण, संजय भगत, राजू हनवते, राठोड आदी उपस्थित होते.