विदर्भात कपाशीवर ‘स्टिंग बग’चा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 00:31 IST2018-09-20T00:30:53+5:302018-09-20T00:31:08+5:30
बोंडे सडली; उष्णतेने पात्यांची गळ वाढली

विदर्भात कपाशीवर ‘स्टिंग बग’चा हल्ला
- रूपेश उत्तरवार
यवतमाळ : गेल्या वर्षी गुलाबी बोंडअळीचा हल्ला झाल्यानंतर यंदा विदर्भात कपाशीवर ‘स्टिंग बग’चा प्रादुर्भाव झाला आहे. कपाशीची बोंडे आतून सडत आहेत. अति उष्णतेने पात्यांची गळ मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
विदर्भात कपाशीची २२ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. गुलाबी बोंडअळीचे नर फेरोमन ट्रॅपमध्ये अडकले. मात्र ही कीड नियंत्रित होत असताना इतर किडींनी कपाशीवर हल्ला केला आहे. कपाशीवर स्टिंग बग, रेड बग किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. ही कीड पाती, फूले अथवा बोंड अवस्थेत डंख मारते. त्यामुळे बोंडे सडतात. ती गळून पडतात.
बोंडांच्या आत अळी नसली, तरी हे बोंड आतून काळे झालेले असते. विदर्भात कमाल ३५ ते ३६ अंशापर्यंत तापमान पोहोचल्याने पात्यांची गळ सुरू आहे. त्यातून कपाशीचे उत्पादन घटण्याचा धोका वाढला आहे.