स्वतंत्र राज्यासाठी विदर्भवाद्यांचे आंदोलन

By Admin | Updated: May 2, 2017 00:02 IST2017-05-02T00:02:58+5:302017-05-02T00:02:58+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विदर्भवाद्यांनी यवतमाळात सोमवारी आंदोलन केले.

Vidarbha movement for independent state | स्वतंत्र राज्यासाठी विदर्भवाद्यांचे आंदोलन

स्वतंत्र राज्यासाठी विदर्भवाद्यांचे आंदोलन

महाराष्ट्र दिनाचे औचित्य : रस्ता रोको, झेंडा फडकविला, रक्ताची स्वाक्षरी मोहीम
यवतमाळ : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विदर्भवाद्यांनी यवतमाळात सोमवारी आंदोलन केले. या आंदोलनात विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.
विदर्भ राज्य आघाडीच्या नेतृत्वात पाचकंदील चौकात सकाळी ८.३० वाजता लोकनायक बापूजी अणे यांच्या पुतळ्यासमोर स्वतंत्र विदर्भ राज्याचा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी वासुदेव विधाते, अ‍ॅड. अमोल बोरखडे, प्रमोद डफळे, राजेश चव्हाण, चंद्रकांत तिजारे, विनोद शेंडे, अरुण नारखेडे, अनुराग बोरखडे, श्रेयस भोयर, दत्ता चांदोरे, सुरेंद्र कांबळे, भीमराव खोब्रागडे आदी सहभागी झाले होते. यावेळी रक्ताची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. तर स्थानिक नेताजी चौकात विदर्भ अन्याय निवारण समितीच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करून काळे झेंडे दाखविण्यात आले. यावेळी माजी आमदार विजयाताई धोटे, विदर्भ अन्याय निवारण समितीच्या सचिव क्रांती धोटे, लालजी राऊत, विजय चापले, डॉ. मुकुंद दंदे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. तर विदर्भ राज्य आंदोलन समितीने मार्इंदे चौकातील कार्यालयावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकाविला. यावेळी विजय निवल, कृष्णराव भोंगाडे, जितेंद्र हिंगासपुरे, तुकाराम खडसे, दत्ता चांदोरे, सोनाली मरगडे, अशोकराव पोहेकर, भरत तोंदवाल आदी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)

शिवसेनेची हुतात्म्यांना आदरांजली
४स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन होत असतानाच शिवसेनेच्यावतीने पाचकंदील चौकात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या १०६ हुतात्म्यांना आंदरांजली अर्पण करण्यात आली. अखंड महाराष्ट्रासाठी शिवसेना कार्य करणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चधरी, नगरसेवक राजेंद्र गायकवाड, शहर प्रमुख पराग पिंगळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Vidarbha movement for independent state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.