बाजार समितीत वाहने तुंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 06:00 IST2020-03-05T06:00:00+5:302020-03-05T06:00:22+5:30

रविवारी वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात कापूस घेऊन आलेली ९३६ वाहने उभी होती. गेल्या तीन दिवसात यातील अर्धेअधिक कापूस गाड्या सीसीआयने खरेदी केल्या. परंतु अजुनही कापसाची आवक सुरूच असल्याने सीसीआयचे अधिकारी हतबल झाले आहेत. वणी परिसरात सीसीआयने किरायाने केलेले जिनिंग हाऊसफुल्ल झाले आहेत. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ याठिकाणीदेखील कापूस साठवायला जागा नाही.

Vehicles tumble in market committee | बाजार समितीत वाहने तुंबली

बाजार समितीत वाहने तुंबली

ठळक मुद्देकापसाची आवक सुरूच : शेतकऱ्यांचा वणीत तीन-तीन दिवस मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : एकीकडे सीसीआयकडे कापूस साठविण्यासाठी जागाच उपलब्ध नसताना दुसरीकडे मात्र कापसाची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू असल्याने सीसीआयचे अधिकारी चांगलेच अडचणीत आले आहेत. बाहेर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर येथे कापूस विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे.
रविवारी वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात कापूस घेऊन आलेली ९३६ वाहने उभी होती. गेल्या तीन दिवसात यातील अर्धेअधिक कापूस गाड्या सीसीआयने खरेदी केल्या. परंतु अजुनही कापसाची आवक सुरूच असल्याने सीसीआयचे अधिकारी हतबल झाले आहेत. वणी परिसरात सीसीआयने किरायाने केलेले जिनिंग हाऊसफुल्ल झाले आहेत. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ याठिकाणीदेखील कापूस साठवायला जागा नाही. अशा परिस्थितीत खरेदी केलेला कापूस ठेवायचा कुठे, या विवंचनेत सीसीआयचे अधिकारी सापडले आहेत. खरेदी केलेल्या कापसाची व्यवस्था लावताना या अधिकाºयांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे कापूस खरेदीची प्रक्रिया मंदावली आहे. दुसरीकडे शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने शेतकºयांना वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात तीन-तीन दिवस मुक्काम ठोकावा लागत आहे. बैलबंडीने कापूस आणणाºया शेतकºयांना बाहेरून चारा आणून बैलांची भूक भागवावी लागत आहे. एकूणच वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत बिकट परिस्थिती निर्माण झाली असल्याचे चित्र पहायला मिळाले.

शेतकऱ्यांना संयम ठेवण्याचे आवाहन
सीसीआयने मंगळवारपर्यंत एकूण पाच लाख २५ हजार ५१५ क्विंटल कापूस खरेदी केला. त्यात शिंदोला येथील बाजार समितीच्या उपकेंद्रावर एक लाख ७१ हजार ३८३, तर वणी बाजार समितीत तीन लाख ५४ हजार १३२ क्विंटल कापूस खरेदी केला. सीसीआय प्रत्येकच गाडी खरेदी करणार आहे. परंतु सध्यस्थिती लक्षात घेता शेतकºयांनी थोडा संयम बाळगावा, असे आवाहन सीसीआयने केले आहे.

Web Title: Vehicles tumble in market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.