टायर फुटल्याने वाहनाचा अपघात; चालक गंभीर जखमी
By रवींद्र चांदेकर | Updated: June 11, 2023 19:54 IST2023-06-11T19:54:22+5:302023-06-11T19:54:41+5:30
रवींद्र चांदेकर / यवतमाळ, नेर : नेर ते दारव्हा रोडवर बोलेरो वाहनाचे अचानक टायर फुटले. त्यामुळे झालेल्या अपघातात चालक ...

टायर फुटल्याने वाहनाचा अपघात; चालक गंभीर जखमी
रवींद्र चांदेकर / यवतमाळ, नेर : नेर ते दारव्हा रोडवर बोलेरो वाहनाचे अचानक टायर फुटले. त्यामुळे झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. टायर फुटल्याने वाहन पलटी झाले होते.
दारव्हाकडून नेरकडे येत असलेल्या बोलेरोचा (क्र.एमएच २८/एबी ४१४२) अचानक टायर फुटला. त्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले. हा अपघात दारव्हा रोडजवळील आश्रमशाळेजवळ घडला. या अपघातात वाहन चालक मोहम्मद इर्शाद रा. नवाबपुरा, नेर हे गंभीर जखमी झाले. घटनेची महिती मिळताच येथील सामाजिक कार्यकर्ते रजा शेख व मित्रांनी घटनास्थळ गाठून जखमीला उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी जखमीला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पाठविले. अद्याप या घटनेची पोलिसांत नोंद झाली नव्हती.