चिमुकल्यांमध्ये मराठीची रूची वाढवतोय ‘वल्लरीचा वाचनकट्टा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST2020-04-14T05:00:00+5:302020-04-14T05:00:19+5:30

‘लॉकडाऊन’च्या काळात इंग्रजी शाळांतून शिकणाऱ्या बालगोपालांची मराठी सुधारावी, त्यांची वाचन, चिंतन व मनन करण्याची प्रक्रिया वाढावी या हेतूने एक ‘पॉझीटिव्ह’ उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘वल्लरीचा वाचनकट्टा’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपच्या माध्यमातून या उपक्रमाला चांद्यापासून बांद्यापर्यंत व यवतमाळातूनही प्रतिसाद मिळत आहे.

'Valari's reading' is raising Marathi interest in minorities | चिमुकल्यांमध्ये मराठीची रूची वाढवतोय ‘वल्लरीचा वाचनकट्टा’

चिमुकल्यांमध्ये मराठीची रूची वाढवतोय ‘वल्लरीचा वाचनकट्टा’

ठळक मुद्देवाचनावर भर : चांदा ते बांदा अन् यवतमाळातील मुलांचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जगभरात ‘कोरोना’ने धुमाकूळ घातला असून ‘पॉझिटीव्ह’ म्हटले तरी अंगावर शहारे येतात. ‘लॉकडाऊन’च्या काळात इंग्रजी शाळांतून शिकणाऱ्या बालगोपालांची मराठी सुधारावी, त्यांची वाचन, चिंतन व मनन करण्याची प्रक्रिया वाढावी या हेतूने एक ‘पॉझीटिव्ह’ उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘वल्लरीचा वाचनकट्टा’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपच्या माध्यमातून या उपक्रमाला चांद्यापासून बांद्यापर्यंत व यवतमाळातूनही प्रतिसाद मिळत आहे.
‘लॉकडाऊन’च्या काळात बहुतांश चिमुकले हे टिव्ही किंवा मोबाईल गेममध्ये गुंग आहेत. मग या वेळेचा मोबाईलद्वारेच सदुपयोग का करू नये असा विचार मूळ अमरावतीमधील व पुण्यात स्थायिक झालेल्या मुक्त व्यवसायी पत्रकार, लेखिका, तसेच नाट्यसमीक्षक क्षिप्रा डाखोडे- देशमुख यांच्या मनात रूंजी घालू लागला. त्यातूनच दोन वर्षांपूर्वी ‘वल्लरीचा वाचनकट्टा’ची निर्मिती झाली. ‘लॉकडाऊन’ची संधी साधून त्यांनी कट्ट्याला व्यापक स्वरूप दिले. आज या कट्ट्यात महाराष्ट्रासह राज्यांतील १३२ मुले, पालक सहभागी झाले आहेत.
कुठलीही स्पर्धा न ठेवता केवळ गोष्टी आणि कवितांचे वाचन, सादरीकरण करून निखळ आनंद लुटताना या कट्ट्यात लेखक, समीक्षक, कवी, निवेदक, पत्रकार, मानसोपचारतज्ञ आदींसह साहित्य, विज्ञान, कला, संगीत, नाट्य आदी विषयातील मान्यवरांचाही सहभाग आहे.
मुलांना आधी गोष्टी ऐकण्याची गोडी लागावी आणि नंतर एकमेकांच्या साथीनं वाचनाचीही आवड निर्माण व्हावी तसेच नवीन शब्दांचा अर्थबोध व्हावा या हेतूने निर्माण झालेल्या या कट्ट्याचा उद्देश सफल होत आहे. हा कट्टा फक्त मराठी गोष्टी, कवितांसाठी आहे. यानिमित्तानं लेखन, वाचन, चिंतन, मनन, चर्चाही केली जाते. टीव्ही, व्हिडीओतून रेडीमेड गोष्टी पाहण्यापेक्षा थेट वाचनामुळे मुलांची कल्पनाशक्ती वाढावी, एकाच गोष्टीच्या अनेक प्रतिमा, छबी त्यांच्या कल्पनेनुसार विस्ताराव्या हा प्रयत्न आहे.
 

Web Title: 'Valari's reading' is raising Marathi interest in minorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.