दारव्हा येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 14:06 IST2021-01-16T14:06:33+5:302021-01-16T14:06:43+5:30
वणी ,आर्णी पांढरकवडा दारव्हा पुसद येथील शासकीय रुग्णालयात लसीकरणाचा कार्यक्रम आज सुरु करण्यात आला.

दारव्हा येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा प्रारंभ
यवतमाळ : जिल्ह्यातील दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली . दारव्हा उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेविका मंजुषा येडांगे पहिल्या लाभार्थी ठरल्या. यवतमाळ जिल्ह्यात १८५०० कोरोनाच्या लसी प्राप्त झाल्या आहेत.
वणी ,आर्णी पांढरकवडा दारव्हा पुसद येथील शासकीय रुग्णालयात लसीकरणाचा कार्यक्रम आज सुरु करण्यात आला. आज एकूण ५०० फ्रंट line वर्कर यांना विविध ठिकाणी लास देण्यात येणार आहे असल्याचे मंजुषा येडांगे यांनी सांगितले.