भाजपाच्या राज्यात अलिखित आणीबाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 22:09 IST2017-09-09T22:08:12+5:302017-09-09T22:09:33+5:30
जो कुणी संघ व भाजपाविरूद्ध बोलेल, वागेल त्याला सरळ एक तर देशद्रोही ठरवायचे किंवा गोळी घालून हत्या करायची, असे प्रकार सध्या दिसून येत अहे......

भाजपाच्या राज्यात अलिखित आणीबाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : जो कुणी संघ व भाजपाविरूद्ध बोलेल, वागेल त्याला सरळ एक तर देशद्रोही ठरवायचे किंवा गोळी घालून हत्या करायची, असे प्रकार सध्या दिसून येत अहे. नकळत एकप्रकारे व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा हा प्रकार असून अलिखीत आणीबाणी असल्याचे परखड मत महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष चारूलताताई टोकस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
तालुक्यातील आमणी येथे प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष वनमालाताई राठोड यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रपरिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, ज्या राज्यात भाजपाप्रणीत सरकारे आहेत, अशा राज्यात महिला, दलित, मुस्लीम कुणीच सुरक्षित नाही. बलात्काराच्या घटनांत वाढ होत आह. शेतकºयांना कर्जमाफीच्या नावाखाली जात विचारली जात आहे. सर्व माहिती सरकारजवळ असताना ६0 प्रकारची माहिती आॅनलाईन भरायला लावून अख्खे कुटुंब रस्त्यावर आणले जात आहे. तरीही कर्जमाफी शेतकºयांच्या पदरात पडली नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
जनतेच्या मागण्यांची पूर्तता करायचे सोडून ते चघळत ठेवण्यात भाजपा सरकारचा हातखंडा आहे. कित्येक मंत्री, आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. मात्र त्यांना ‘क्लिनचिट’ देण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप टोकस यांनी केला. पत्रकार परिषदेला माजी आमदार विजयराव खडसे, प्रा.कैलास राठोड, रमेश चव्हाण, वनमालाताई राठोड, शैलेश कोपरकर, सुनील राठोड, दलितानंद खडसे, भगवान पंडागळे, सुशीलाबाई पाचकोरे, पंजाबराव गावंडे, प्रकाश नरवाडे उपस्थित होते.