शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

टिप्परखाली सापडून चिमुरडीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 22:31 IST

आॅटोतून उतरून रस्ता पार करताना एक नऊ वर्षीय बालिकेचा टिप्परखाली सापडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास वणी-वरोरा मार्गावरील नायगाव (निपाणी) फाट्याजवळ घडली.

ठळक मुद्देनायगाव फाट्यावरील घटना : संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

ऑनलाईन लोकमतवणी : आॅटोतून उतरून रस्ता पार करताना एक नऊ वर्षीय बालिकेचा टिप्परखाली सापडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास वणी-वरोरा मार्गावरील नायगाव (निपाणी) फाट्याजवळ घडली.तनुश्री मनोज ठाकरे असे मृत बालिकेचे नाव आहे. या घटनेनंतर नायगाव फाट्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. चालक व मालकाला घटनास्थळी हजर करा, या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. दरम्यान, वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांची समजूत काढली. अपघातानंतर टिप्परच्या चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. सायंकाळी उशिरापर्यंत तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. वणी येथील रहिवासी असलेली मनोज ठाकरे यांची कन्या तनुश्री येथील सुशगंगा पब्लिक स्कूलची तिसºया वर्गाची विद्यार्थिनी होती. गुरूवारी नायगाव येथे नातलगांकडे कार्यक्रम असल्याने ती तिच्या आजोबांसोबत आॅटोने नायगाव फाट्यावर पोहोचली. आॅटो थांबल्यानंतर आजोबा आॅटोचालकाला पैसे देत असतानाच तनुश्रीने आॅटोतून खाली उडी घेतली व धावतच रस्ता पार करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान या मार्गावरून रेती भरून येत असलेल्या भरधाव टिप्परने तिला धडक देऊन दूरवर फरफटत नेले. या दुर्घटनेत गंभीररित्या जखमी होऊन तनुश्रीचा जागीच मृत्यू झाला.

टॅग्स :Accidentअपघात