शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

उघड उघड कॉप्या, तरी पथके म्हणतात ‘नील’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:08 IST

दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला अनेक केंद्रांमध्ये उघड उघड कॉपीचा प्रकार घडला, तरी शिक्षण विभागाच्या भरारी पथकांनी मात्र एकही कॉपी बहाद्दर सापडला नसल्याचा आव आणला आहे. मंगळवारच्या प्रकाराने कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले.

ठळक मुद्देकॉपीमुक्तीचा फज्जा : चिचघाट आश्रमशाळेत शिक्षकांनी पुरविल्या कॉप्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला अनेक केंद्रांमध्ये उघड उघड कॉपीचा प्रकार घडला, तरी शिक्षण विभागाच्या भरारी पथकांनी मात्र एकही कॉपी बहाद्दर सापडला नसल्याचा आव आणला आहे. मंगळवारच्या प्रकाराने कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले.गेल्या दोन वर्षांपासून शिक्षण विभागाने कॉपी मुक्त परीक्षा अभियानाचा मोठा गाजावाजा केला. हे अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असताना शिक्षकच या अभियानाला आग लावताना मंगळवारी पाहायला मिळाले. यवतमाळलगतच्या चिचघाट येथील आश्रमशाळेच्या परीक्षा केंद्रावर मंगळवारी इंग्रजीचा पेपर होता. यावेळी अनेक विद्यार्थ्यांना खुद्द शिक्षकांनीच पेपर सोडवून दिला. तर काही शिक्षक चक्क विद्यार्थ्यांना कॉपी नेऊन देत होते. हा प्रकार इतका बिनधास्त घडत होता की, जागरूक नागरिकाने आपला गैरप्रकार मोबाईलमध्ये छायाचित्रे घेऊन चव्हाट्यावर आणला, याचेही कुणाला भान नव्हते.एकीकडे हा प्रकार घडत असताना शिक्षण विभागाने जिल्हाभरात पाठविलेल्या भरारी पथकांनी मात्र सायंकाळी ‘नील’चा शेरा दिला. जिल्ह्यातील एकाही केंद्रावर एकही कॉपी बहाद्दर पकडण्यात आला नाही. त्यामुळे चिचघाटमधील प्रकार ‘सामूहिक सहमती’ने तर घडला नाही ना, असा संशय जागरूक नागरिक व्यक्त करीत आहे. चिचघाटची आश्रमशाळा यवतमाळपासून जवळ असल्याने अनेक जण इथे बदली मागून घेतात. यवतमाळवरून अप-डाउन करतात. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी अधीक्षक वगळता येथे एकही कर्मचारी नसतो.आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने नुकतीच आश्रमशाळांची गुणवत्ता चाचणी घेतली होती. त्यात गुणवत्ता ढासळल्याचे दिसल्याने शिक्षकांवर कारवाईचे हत्यारही उपसले होते. येथे येणाऱ्या गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याऐवजी कॉप्या पुरवून पास करून देण्याचा प्रयत्न शिक्षक करताना दिसले. त्यामुळे ही विद्यार्थ्यांची एक प्रकारे फसवणूक असल्याचे जागरूक नागरिकांचे म्हणणे आहे.या केंद्रात ४०३ विद्यार्थी परीक्षा देत आहे. मंगळवारी कॉपीचा प्रकार मला तरी आढळला नाही. येथे ठाणेदारांसह दोन-तीन पोलीस कर्मचारी तैनात होते, त्यामुळे कॉपीचा प्रश्नच उद्भवत नाही. इन्व्हीजीलेटरचे मोबाईलही आम्ही ताब्यात घेतले होते.- सीमा वाघमारे, मुख्याध्यापिका, चिचघाट आश्रमशाळा

टॅग्स :examपरीक्षा