शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
3
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
4
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
5
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
6
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
7
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
8
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
9
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
10
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
11
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
12
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
13
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
14
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
16
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
17
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
18
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
19
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
20
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”

दोन वर्षांपूर्वीच फुटले असते भूखंड घोटाळ्याचे बिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 22:29 IST

मयताच्या नावावर तोतया भूखंड मालक उभा करून व बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केली गेल्याची तक्रार एका महिला डॉक्टरने दोन वर्षांपूर्वीच लोहारा पोलिसांकडे केली होती.

ठळक मुद्देलोहारा पोलिसांचा हलगर्जीपणा : डॉक्टरची तक्रार ठेवली थंडबस्त्यात, बँका-भूखंड मालकांची फसवणूक टळली असती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मयताच्या नावावर तोतया भूखंड मालक उभा करून व बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केली गेल्याची तक्रार एका महिला डॉक्टरने दोन वर्षांपूर्वीच लोहारा पोलिसांकडे केली होती. त्या तक्रारीची तेव्हाच तत्परतेने पोलिसांनी दखल घेतली असती तर भूखंड घोटाळा आणि त्याआड बँका, भूखंडधारकांची आज झालेली कोट्यवधींची फसवणूक टाळता आली असती.येथील डॉ. सारिका महेश शाह (शिंदे प्लॉट, यवतमाळ) यांनी ५ आॅगस्ट २०१६ रोजी लोहारा पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीची प्रत ‘लोकमत’कडे सादर केली आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे भूखंड घोटाळ्याला वाव मिळाल्याच्या या प्रकरणाचे बिंग फुटले. डॉ. सारिका शाह यांनी सांगितले की, २०१३ मध्ये विजय महल्ले नामक व्यक्ती त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत होता. त्याच्यावर आमचा विश्वास होता. त्याच्या माध्यमातून वाघापूर येथील सावित्रीबाई फुले सोसायटी दोन हजार २४९ चौरस फूट क्षेत्रफळाचा प्लॉट आम्ही विकत घेतला. त्यापोटी तीन लाखांचा सौदा केला. त्यावेळी विजयने भूखंड मालक व अन्य काहींची ओळख करून दिली होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी भूखंड मालक कृष्णराव सुरोशे यांचा मुलगा आम्हाला भेटला व तुम्ही भूखंड कसा खरेदी केला अशी विचारणा त्याने केली. कारण आपले वडील १९९४ लाच मरण पावल्याचे त्याने सांगितले. हा प्रकार ऐकून धक्काच बसला. त्यानंतर विजय महल्ले व त्याच्या साथीदारांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा थांगपत्ता लागला नाही. दरम्यान कृष्णराव सुरोशे मयत असताना त्यांच्या नावावर उभा झालेला व्यक्ती तोतया असल्याचे व त्यांची कागदपत्रेही बोगस असल्याचे निष्पन्न झाले. तीन लाखांनी फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याने आम्ही ५ आॅगस्ट २०१६ रोजीच या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद नोंदविली. फसवणूक कशी झाली व ती कुणी केली त्यांची नावेही त्यात नमूद केल्याचे सारिका शाह यांनी सांगितले.एकच भूखंड पुन्हा विकलाविशेष असे, शाह यांना प्लॉट विकल्यानंतर त्या व्यक्तींनी आणखी तिसऱ्याला त्यातील अर्धा भूखंड पुन्हा विकून त्यांचीही फसवणूक केली. वास्तविक डॉ. सारिका शाह यांनी दोन वर्षापूर्वीच भूखंड खरेदीतील हा गैरप्रकार लोहारा पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला होता. मात्र तत्कालीन ठाणेदारांनी त्याची गांभीर्याने दखल न घेता ही तक्रार थंडबस्त्यात टाकली. तक्रार होऊनही कारवाई न झाल्याने भूमाफिया टोळीची हिंमत वाढली व त्यांनी तोच पॅटर्न वापरत यवतमाळ शहरात अनेकांना गंडा घातला. अशाच पद्धतीने तोतया मालक उभा करून अनेक भूखंडधारकांची फसवणूक केली. मूळ मालक नसताना एकाच भूखंडावर अनेक बँकांचे कर्ज उचलून बँकांचीही कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली. लोहारा पोलिसांनी दोन वर्षांपूर्वीच तक्रारीची दखल घेतली असती तर भूखंड घोटाळा आणि बँकांची झालेली कोट्यवधींची फसवणूक टाळता आली असती, हेच डॉ. सारिका शाह यांच्या तेव्हाच्या तक्रारीवरून स्पष्ट होते. विश्वासू माणसानेच आमची फसवणूक केली, भूखंड घोटाळ्यात आमचा कोणताही सहभाग नसल्याचे डॉ. सारिका शाह यांनी सांगितले.दुय्यम निबंधक संशयाच्या भोवऱ्यातभूखंड खरेदी-विक्री प्रकरणात येथील दुय्यम निबंधक कार्यालयाची भूमिका महत्वाची असते. कागदपत्रांची शहानिशा करण्याची जबाबदारी त्यांची असते. फोटो ओळखपत्राची खातरजमा या कार्यालयाने करणे आवश्यक आहे. मात्र हे कार्यालय सदर काम प्रामाणिकपणे करीत नसल्यानेच भूखंड घोटाळ्यात माझ्यासह अनेकांची फसवणूक झाल्याचे व या कार्यालयाचा एकूणच कारभार संशयास्पद असल्याचे डॉ. सारिका शाह यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी