विनयभंग करणाऱ्याला दोन वर्षाचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 21:48 IST2019-02-04T21:48:20+5:302019-02-04T21:48:38+5:30
गावातील अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून तिच्यासोबत अश्लील चाळे करणाºया आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. वडकी येथील प्रकरणात पीडितेची साक्ष ग्राह्य मानून निकाल देण्यात आला.

विनयभंग करणाऱ्याला दोन वर्षाचा कारावास
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गावातील अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून तिच्यासोबत अश्लील चाळे करणाºया आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. वडकी येथील प्रकरणात पीडितेची साक्ष ग्राह्य मानून निकाल देण्यात आला.
राजेंद्र वामनराव लेनगुरे रा. वडकी ता. राळेगाव असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने १७ आॅगस्ट २०१५ रोजी गावातीलच अल्पवयीन मुलीला किराणा दुकानातून घरी जात असताना स्वत:च्या घरी नेले. तेथे अश्लील चित्रफित दाखवून तिच्यासोबत चाळे केले. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. वडकी ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अण्णा ऊईके यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा विशेष न्यायाधीश टी.एस. अकाली यांनी या खटल्यात एकूण चार साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलगी, तिची आई व पोलीस अधिकाºयाची साक्ष ग्राह्य धरुन आरोपीला दोन वर्ष कारावास आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने कारावास राहणार आहे. या खटल्यात सहायक सरकारी वकील यु.के. पांडे यांनी बाजू मांडली. त्यांना पैरवी अधिकारी जमादार वाघु कन्नाके यांनी सहकार्य केले.