शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

बेवारस बॅगेत आढळले दोन कासव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 6:00 AM

बसस्थानक परिसरातील वाहतूक नियंत्रक कार्यालयाजवळ एक बॅग गुरुवारी रात्री बेवारस पडून होती. सदर बॅग एका वाहकाला आढळली. त्या बॅगमध्ये एखादी घातक वस्तू किंवा पदार्थ असण्याची शक्यता असल्यामुळे बसस्थानक परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या बेवारस बॅगबाबत संशय आल्याने त्वरित पोलिसांना कळविण्यात आले.

ठळक मुद्देदारव्हा येथील घटना : गुप्तधन शोधणारी टोळी सक्रीय

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : येथील बसस्थानकावर गुरुवारी रात्री एक बेवारस बॅग आढळली. या बॅगेत पूजा केलेले दोन कासव आढळले. गुप्तधनासाठी या कासवांची वाहतूक केली जात असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यामुळे तालुक्यात गुप्तधन शोधणारी टोळी सक्रिय असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.येथील बसस्थानक परिसरातील वाहतूक नियंत्रक कार्यालयाजवळ एक बॅग गुरुवारी रात्री बेवारस पडून होती. सदर बॅग एका वाहकाला आढळली. त्या बॅगमध्ये एखादी घातक वस्तू किंवा पदार्थ असण्याची शक्यता असल्यामुळे बसस्थानक परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या बेवारस बॅगबाबत संशय आल्याने त्वरित पोलिसांना कळविण्यात आले. रात्र गस्तीवर असलेले पोलीस पथक त्वरित घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बॅग ताब्यात घेऊन तपासणी केली. त्यात दोन जिवंत कासव आढळले.यामध्ये एक छोटा व मोठा कासव होता. या दोन्ही कासवांची पूजा केल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या पाठीवर स्वस्तिकचे चिन्ह दिसून आले. त्यामुळे गुप्तधन शोधण्यासाठी या कासवांना पकडून आणले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु या कासवांना बेवारस स्थितीत बसस्थानकावर का सोडले असावे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे तालुक्यात गुप्तधन शोधणारी टोळी सक्रिय असल्याचे दिसून येते. दरम्यान, पोलिसांनी या कासवांना वन विभागाच्या सुपूर्द केले. दोनही कासवांना लगतच्या तलावात सोडून दिल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे यांनी सांगितले. सदर प्रकरणाची पोलीस आणि वन विभाग चौकशी करीत आहे.