दोन पोलीस निलंबित, एक मुख्यालयात रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:00 IST2020-04-15T05:00:00+5:302020-04-15T05:00:55+5:30

सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश शिवराम वाघमारे (ब.नं. १२१७) व जमादार संजय शिंगारे (ब.नं. १६४३) अशी निलंबितांची नावे आहे. हे दोघेही पोलीस मुख्यालयात नियुक्तीला आहेत. तर घाटंजी पोलीस ठाण्यातील शिपाई नीलेश कदम (ब.नं. १५११) याला पोलीस मुख्यालयात अटॅच करण्यात आले. वाघमारे यांच्यावर दारू तस्करीचा, शिंगारे यांच्यावर लॉकडाऊन दरम्यान गोरगरिबांना अन्न वाटपासाठी डॉक्टरांकडून परस्पर पोलिसांच्या नावे वसुली केल्याचा आरोप आहे.

Two policemen suspended, one deported to headquarters | दोन पोलीस निलंबित, एक मुख्यालयात रवाना

दोन पोलीस निलंबित, एक मुख्यालयात रवाना

ठळक मुद्देगुन्हा दाखल : दारू तस्करी, पैसे मागणीचा ठपका

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी विविध कारणांवरून मंगळवारी एकाच दिवशी दोन पोलिसांना निलंबित केले तर एकाची पोलीस मुख्यालयात रवानगी केली.
सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश शिवराम वाघमारे (ब.नं. १२१७) व जमादार संजय शिंगारे (ब.नं. १६४३) अशी निलंबितांची नावे आहे. हे दोघेही पोलीस मुख्यालयात नियुक्तीला आहेत. तर घाटंजी पोलीस ठाण्यातील शिपाई नीलेश कदम (ब.नं. १५११) याला पोलीस मुख्यालयात अटॅच करण्यात आले. वाघमारे यांच्यावर दारू तस्करीचा, शिंगारे यांच्यावर लॉकडाऊन दरम्यान गोरगरिबांना अन्न वाटपासाठी डॉक्टरांकडून परस्पर पोलिसांच्या नावे वसुली केल्याचा आरोप आहे. तर कदम या पोलीस शिपायाने नाकाबंदी दरम्यान ट्रक चालकाला पैशाची मागणी केल्याचा ठपका आहे. दारू तस्करी प्रकरणी एएसआय वाघमारे यांच्यावर यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातून दारू व स्कुटी जप्त करण्यात आली. वाघमारे व शिंगारे यांची खातेनिहाय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. वाघमारे यांची सेवानिवृत्ती अवघ्या दोन महिन्यांवर आहे. मंगळवारी सकाळी १०.३० वाजता आसेगावदेवी येथे वाघमारे यांना गावकऱ्यांनीच स्कुटीतून दारू नेताना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. स्कुटीची सर्वांसमक्ष झडती घेण्यात आली. यावेळी गावातील प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित होती. ही दारू पिण्यासाठी की विक्रीसाठी हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.

आता पुसदमध्ये कारवाईवर नजरा
एकाच दिवशी तीन पोलिसांवर कारवाई करून जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, कुणाचीही गय केली जाणार नाही, असेच संकेत दिले आहे. आता पुसद येथे ओळखपत्र असूनही आरोग्य कर्मचाऱ्यांला अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर नेमकी काय कारवाई होते, याकडे नजरा लागल्या आहेत.

Web Title: Two policemen suspended, one deported to headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस