नारळीत दोन गटात हाणामारी, दहाजण जखमी, वाहनांची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 22:41 IST2017-10-07T22:34:16+5:302017-10-07T22:41:09+5:30
उमरखेड तालुक्यातील नारळी येथे नारळी गाव विरुध्द नारळी तांडा यांच्यात लहानश्यात कारणावरुन शनिवारी रात्री तुफन हाणामारी झाली.

नारळीत दोन गटात हाणामारी, दहाजण जखमी, वाहनांची तोडफोड
फुलसावंगी - उमरखेड तालुक्यातील नारळी येथे नारळी गाव विरुध्द नारळी तांडा यांच्यात लहानश्यात कारणावरुन शनिवारी रात्री तुफन हाणामारी झाली. दगड फेकीत वाहनांची तोडफोड करण्यात साली.
२ ऑक्टोबर रोजी ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रीयेत अडचन निर्माण झाली. ही सभा तहकुब करुन ६ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली. या मध्ये अध्यक्षासाठी तांडा विरुध्द नारळी गाव असे वातावरण झाले होते. या मध्ये तांड्यातील लोकांनी माघार घेऊन संतोष शंकर जाधव यांना अध्यक्ष केले.
पण यांची मने मात्र दुरावली. शनिवारी रात्री नारळी गावातील एका नागरीकचे व तांड्यातील मुलाचा लहानश्या कारणा वरुन दोघात भांडण झाले पण नंतर गावातील ६० ते ७० लोकांच्या जमावाने तांड्यात प्रवेश करुन त्या मुलाला मारहाण केली .