कोरोना तपासणीसाठी दिग्रसचे दोघे यवतमाळ मेडिकलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST2020-04-01T05:00:00+5:302020-04-01T05:00:17+5:30

तीन दिवसांपूर्वी बुलडाणा येथे कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान हा मृत व्यक्ती १८ मार्च रोजी दारव्हा येथे आला होता. त्यावेळी दिग्रस येथील काही जण त्याच्या संपर्कात आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यामुळे प्रशासनाने दिग्रसच्या मोतीनगर परिसरात राहणाऱ्या दोघांना कोरोना तपासणीसाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविले. या दोघांच्याही परिवारातील ११ सदस्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले.

Two from Digras to Yavatmal Medical for corona examination | कोरोना तपासणीसाठी दिग्रसचे दोघे यवतमाळ मेडिकलमध्ये

कोरोना तपासणीसाठी दिग्रसचे दोघे यवतमाळ मेडिकलमध्ये

ठळक मुद्देदोन कुटुंबातील ११ जण होम क्वारंटाईन : सतर्कतेचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : बुलडाणा जिल्ह्यात मृत पावलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या येथील दोघांना मंगळवारी पोलिसांनी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविले. तर या दोघांच्याही परिवारातील ११ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून नागरिकांनी न घाबरता सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
तीन दिवसांपूर्वी बुलडाणा येथे कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान हा मृत व्यक्ती १८ मार्च रोजी दारव्हा येथे आला होता. त्यावेळी दिग्रस येथील काही जण त्याच्या संपर्कात आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यामुळे प्रशासनाने दिग्रसच्या मोतीनगर परिसरात राहणाऱ्या दोघांना कोरोना तपासणीसाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविले. या दोघांच्याही परिवारातील ११ सदस्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. मात्र दोघांना मंगळवारी ताबडतोब यवतमाळला हलविण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली.
येथील ग्रामीण रुग्णालयाच्या चमूने पोलीस बंदोबस्तासह मोतीनगर भागात पोहोचून त्या दोघांना रुग्णवाहिकेत यवतमाळला रवाना केले.
मात्र अद्याप या दोघांचा कोणताही अहवाल आलेला नाही. अहवाल येईपर्यंत कोणत्याही अफवा पसरवू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या दोघांचेही अहवाल निगेटीव्हच यावे अशी प्रार्थना दिग्रसवासीय करीत आहे. कोरोनामुळे संचारबंदी लागू आहे. त्यामुळे लोकांनी घर सोडून बाहेर पडू नये असे आवाहन ठाणेदार सोनाजी आमले यांनी केले आहे.

Web Title: Two from Digras to Yavatmal Medical for corona examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.