ढाणकीच्या दोघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 18:42 IST2020-01-17T18:41:47+5:302020-01-17T18:42:00+5:30

यवतमाळ : जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यांतर्गत येणाºया ढाणकी येथील मिस्त्री काम करणाºया दोन तरुणांचा शुक्रवारी सकाळी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्याच्या ...

two died in electric shock | ढाणकीच्या दोघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू

ढाणकीच्या दोघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू

यवतमाळ : जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यांतर्गत येणाºया ढाणकी येथील मिस्त्री काम करणाºया दोन तरुणांचा शुक्रवारी सकाळी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्याच्या डोल्हारी येथे विजेचा धकका लागून मृत्यू झाला. या घटनेने ढाणकी गावावर शोककळा पसरली आहे.


कादीर कुरेशी (२६) व फिरोज खान पठाण (२७) रा.ढाणकी अशी मृतांची नावे आहेत. गवंडी काम करण्यासाठी ते डोल्हारी गावातील दिलीप राऊत यांच्याकडे गेले होते. त्यांच्या घराच्या स्लॅबचे काम सुरू असताना हातातील रॉडचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने दोघांनाही जोरदार शॉक लागला. त्यांना उपचारार्थ नांदेड येथे नेले जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, लहान मुले असा परिवार आहे.

Web Title: two died in electric shock