पुसदमध्ये २४ तासात दोन भावांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 14:26 IST2020-07-18T14:26:31+5:302020-07-18T14:26:36+5:30
वसंतनगर परिसरातील दोन भावांचा अवघ्या २४ तासांच्या अंतरात मृत्यू झाला. यामुळे वसंतनगरवर शोककळा पसरली आहे.

पुसदमध्ये २४ तासात दोन भावांचा मृत्यू
पुसद (यवतमाळ) : येथील वसंतनगर परिसरातील दोन भावांचा अवघ्या २४ तासांच्या अंतरात मृत्यू झाला. यामुळे वसंतनगरवर शोककळा पसरली आहे.
वसंतनगरमधील ४८ वर्षीय इसम टायफाईडच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना पुढील उपचारासाठी १६ जुलै रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास यवतमाळला रवाना करण्यात आले. मात्र वाटेत दिग्रसजवळ त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला २४ तास लोटत नाही तोच १७ जुलै रोजी त्यांचे शिक्षक असलेले ४४ वर्षीय बंधू कोरोनामुळे मृत्युमुखी पडले. सदर ४४ वर्षीय शिक्षकाचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. अवघ्या २४ तासांच्या अंतरात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने वसंतनगर परिसरावर शोककळा पसरली आहे.