यवतमाळ जिल्ह्यात दोन दुचाकीची धडक, दोघांचा मृत्यू, एक जखमी
By विलास गावंडे | Updated: December 29, 2023 20:41 IST2023-12-29T20:41:09+5:302023-12-29T20:41:38+5:30
दुसऱ्या दुचाकीवरील देवानंद जगदेवराव राऊत यांचा उपचाराकरिता रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

यवतमाळ जिल्ह्यात दोन दुचाकीची धडक, दोघांचा मृत्यू, एक जखमी
घारफळ (यवतमाळ) : दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, ही घटना शुक्रवारी दुपारी ५ वाजेच्या सुमारास सरुळ ते परसोडी (ता.बाभूळगाव) मार्गावर घडली. कुणाल ज्ञानेश्वर गांजरे (२३) रा. वाटखेड (बु.) व देवानंद जगदेवराव राऊत (५०) रा.शेंदुरजना खुर्द (ता.धामणगाव रेल्वे, जि.अमरावती) अशी मृतांची नावे आहेत.
बाभूळगाव तालुक्यातील सरुळ येथील यात्रेसाठी वाटखेड (बु.) येथील कुणाल ज्ञानेश्वर गांजरे व नीलेश रुपराव गांजरे (२९) हे दोघे एमएच २९ - एई ४६५७ या क्रमांकाच्या दुचाकीने आले होते. यात्रा करून गावी परत जात होते. त्याचवेळी एमएच २७ - सीई ७८२१ या क्रमांकाची दुचाकी परसोडीकडून सरुळ येथे येत होती. या दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कुणाल ज्ञानेश्वर गांजरे हा जागीच ठार झाला, तर त्याच्या दुचाकीवरील नीलेश रूपराव गांजरे हा जखमी झाला आहे. त्याला बाभूळगाव येथे हलविण्यात आले. दुसऱ्या दुचाकीवरील देवानंद जगदेवराव राऊत यांचा उपचाराकरिता रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.