अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दोन जण जागीच ठार

By विलास गावंडे | Updated: January 18, 2025 12:27 IST2025-01-18T12:26:20+5:302025-01-18T12:27:53+5:30

Yavatmal : महागाव -उमरखेड रोडवर असलेल्या पेट्रोल पंपसमोरील घटना

Two bike riders killed on the spot after being hit by an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दोन जण जागीच ठार

Two bike riders killed on the spot after being hit by an unknown vehicle

महागाव(यवतमाळ) : अज्ञात  वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दोन तरुण जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी रात्री महागाव -उमरखेड रोडवर असलेल्या पेट्रोल पंपाच्या समोरील वळणावर घडली.

अर्जुन गजेंद्र देशमुख( वय १९) रा. महागाव, अजय सतीश विरखेडे( वय, 20) रा. वाकोडी असे मृत  तरुणाची नावे आहेत. दुचाकी क्रमांक एम एच २९ बी. डब्ल्यू ८९६९ ने दोघेजण नांदगव्हान वरून महागावकडे येत असताना हा अपघात रात्री घडला. अपघात घडल्यानंतर मोटरसायकल आणि दोन्ही तरुणाचे मृतदेह एका बाजूला असलेल्या खोल भागामध्ये फेकण्यात आले होते. अपघातामध्ये ठार झालेला अर्जुन देशमुख हा तरुण महागाव येथील प्रसिद्ध वकील गजेंद्र देशमुख यांचा लहान मुलगा आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर नागरिकांची गर्दी झाली होती. घटनास्थळावर ठाणेदार धनराज निळे, यांनी भेट देऊन पंचनामा केला.

Web Title: Two bike riders killed on the spot after being hit by an unknown vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.