विहिरीत पडून दोन अस्वलांचा मृत्यू; यवतमाळ जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 12:51 IST2020-01-16T12:50:43+5:302020-01-16T12:51:05+5:30
महागाव तालुक्यातील कोठारी शिवारात शेतातील विहिरीत पडून दोन अस्वलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

विहिरीत पडून दोन अस्वलांचा मृत्यू; यवतमाळ जिल्ह्यातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महागाव तालुक्यातील कोठारी शिवारात शेतातील विहिरीत पडून दोन अस्वलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. घटनास्थळी वनविभागाची चमू दाखल झाली असून ही दोन अस्वले तेथे कशी आली हा तपास घेण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात विहिरीत पडलेल्या दोन अस्वलांना जीवनदान देण्यात आले होते हे येथे विशेष उल्लेखनीय.