जांब बायपासवर ट्रकची समोरासमोर भीषण धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 06:00 IST2019-12-30T06:00:00+5:302019-12-30T06:00:07+5:30

चंद्रभान गोविंदप्रसाद विश्वकर्मा (३५) रा. उदयपूर ता. बचैया जि. कटनी मध्यप्रदेश असे मृत चालकाचे नाव आहे. तर सुनील आदित्यसिंग ठाकूर (३८) रा.श्रीरामपूर जि. अहमदनगर हा गंभीर जखमी आहे. नागपूर-बोरी-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ शहरातूनच जातो. बायपासवर या मार्गाचे रुंदीकरण झाले आहे. चौपदरीकरणानंतर येथे अपघात कमी होण्याऐवजी वाढले आहे.

The truck face-to-face collision at the jamb bypass | जांब बायपासवर ट्रकची समोरासमोर भीषण धडक

जांब बायपासवर ट्रकची समोरासमोर भीषण धडक

ठळक मुद्देएक जागीच ठार, दुसरा गंभीर : सात तासात दुसरा अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरालगतच्या जांब बायपासवर शनिवारी अपघाताची मालिकाच पहायला मिळाली. सायंकाळी क्रिकेट खेडाळूंचे वाहन पुलाच्या संरक्षण भिंतीवर धडकून दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा काही तासाने रात्री १०.३० वाजताच्या सुमारास दोन ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. यात एका चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे.
चंद्रभान गोविंदप्रसाद विश्वकर्मा (३५) रा. उदयपूर ता. बचैया जि. कटनी मध्यप्रदेश असे मृत चालकाचे नाव आहे. तर सुनील आदित्यसिंग ठाकूर (३८) रा.श्रीरामपूर जि. अहमदनगर हा गंभीर जखमी आहे. नागपूर-बोरी-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ शहरातूनच जातो. बायपासवर या मार्गाचे रुंदीकरण झाले आहे. चौपदरीकरणानंतर येथे अपघात कमी होण्याऐवजी वाढले आहे.
सुसाट वेगाने वाहने जातात. विशेष करून वनवासी मारोती येथे चौफुली आहे, जांब गावाकडे जाण्यासाठी चौफुली आहे. गोदनी येथे चौफुली आहे, त्यानंतर चापडोह पुनर्वसन येथे घाटंजीला जाण्यासाठीचा मार्ग असल्याने चौफुली आहे. या ठिकाणी वाहनधारकांचा गोंधळ उडत आहे. त्यामुळे बरेचदा विरुद्ध दिशेने वाहन चालविले जाते. यातूनच अपघात घडत आहे. डायव्हरशन व्यवस्थित दिसत नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितले जाते. शनिवारी रात्री कोळसा घेऊन जात असलेला ट्रक (एमएच-४२-बी-७७३२) चुकीच्या दिशेने येत होता, त्याने समोरुन येणाऱ्या टँकरला (क्र.एमएच-३१-सीक्यू-३७१४) जोरदार धडक दिली. यात कोळसा ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. एलिमेंट मॉलसमोर हा अपघात घडला. कोळसा घेऊन हा ट्रक नांदेडकडे जात होता.

Web Title: The truck face-to-face collision at the jamb bypass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात