पुसदमध्ये शहिदांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:40 AM2021-03-25T04:40:26+5:302021-03-25T04:40:26+5:30

पुसद : स्थानिक सुभाष वार्ड येथे अखिल भारतीय नौजवान सभेच्या वतीने शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्त आदरांजली ...

Tribute to the martyrs in Pusad | पुसदमध्ये शहिदांना आदरांजली

पुसदमध्ये शहिदांना आदरांजली

Next

पुसद : स्थानिक सुभाष वार्ड येथे अखिल भारतीय नौजवान सभेच्या वतीने शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली.

नौजवान सभेचे जिल्हा सचिव निखिल टोपलेवार यांनी विचार व्यक्त केले. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी तरुणाईतच देशासाठी बलिदान दिले. त्यांचे विचार आत्मसात करून आजच्या तरुणांनी अनुकरण करण्याची गरज आहे. देश भांडवलशाहीकडे न जाता समाजवादाकडे वळला पाहिजे, अशी इच्छा भगतसिंगांची होती. परंतु तसे न होता शहिदांच्या नावाचा वापर राजकारणासाठी करून त्यांच्या विचारधारेला सपशेल डावलण्यात येते. त्यामुळे नौजवानांनी भगतसिंग यांची विचारधारा समजून घेण्याची आवश्यकता आहे, असे मत टोपलेवार यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाला रहेमान चव्हाण, बाळू शिवणकर, अमोल गवरशेट्टीवार, हनुमान बोरकर, साहेबराव राऊत, प्रमोद धुळे, अभिषेक जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Tribute to the martyrs in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.