यवतमाळमध्ये रावण दहणाला आदिवासी संघटनांचा विरोध; रावणाच्या प्रतिकृती समोर निदर्शने
By सुरेंद्र राऊत | Updated: October 5, 2022 21:16 IST2022-10-05T21:15:31+5:302022-10-05T21:16:17+5:30
रावण हा आदिवासी समाजाचा राजा व कुळ दैवत असल्याने रावण दहन करणे म्हणजे आदिवासींच्या धार्मिक भावनांना दुखावणे असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले.

यवतमाळमध्ये रावण दहणाला आदिवासी संघटनांचा विरोध; रावणाच्या प्रतिकृती समोर निदर्शने
यवतमाळ : शहरातील छत्रपती शिवाजी ग्राउंडवर उभ्या केलेल्या रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बुधवारी विविध आदिवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घेराव करून रावण दहन परंपरेला विरोध दर्शविला आहे. तसेच रावण दहन केल्या जात असेल तर तेथे उपस्थित सर्व आदिवासी बांधव रावणासाहित दहन होण्याचा गंभीर ईशारा दिला.
रावण हा आदिवासी समाजाचा राजा व कुळ दैवत असल्याने रावण दहन करणे म्हणजे आदिवासींच्या धार्मिक भावनांना दुखावणे असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले. त्यामुळे रावण दहन होऊ नये,ही प्रथा बंद व्हावी,यासाठी कोरोना आधी आदिवासी संघटनांनी कडाडून विरोध करत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले होते, मात्र यावर्षी पुन्हा आमच्या राजा रावणाचे दहन होत असल्याने, रावण राजा सोबत उपस्थित सर्व आदिवासी आंदोलकांना सुद्धा जाळून टाका अश्या भावनिक प्रतिक्रिया यावेळी आंदोलकांनी व्यक्त केल्या.