यवतमाळ जिल्ह्यातल्या आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 12:38 IST2017-11-13T12:35:47+5:302017-11-13T12:38:52+5:30
उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे प्रदीप संदीप शेळके (७) रा. पारडी (चुरमुरा) हा मुलगा रविवारी दुपारी ४ वाजल्यापासून शाळेतून बेपत्ता झाला होता.

यवतमाळ जिल्ह्यातल्या आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याचा खून
ठळक मुद्देदगडाने मारल्याच्या खुणाउमरखेडचे माजी आमदार उत्तमराव इंगळे यांची शाळा
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ-उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे प्रदीप संदीप शेळके (७) रा. पारडी (चुरमुरा) हा मुलगा रविवारी दुपारी ४ वाजल्यापासून शाळेतून बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो कुठेच सापडला नाही. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह टेंभेश्वर दत्तमंदिरामागील तल्याजवळ आढळला. त्याच्या डोक्याच्या मागच्या भागात दगडाने मारल्याच्या खुणा व रक्त आढळून आले. पोलीस तपास सुरू आहे.