शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मावळ्यांची गर्जना, जय शिवाजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 9:47 PM

छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती शनिवारी जिल्हाभरात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यवतमाळ शहरासह दिग्रस, पुसद, घाटंजी, पांढरकवडासारख्या ठिकाणी यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले.

ठळक मुद्देशिवजयंती साजरी : यवतमाळसह दिग्रसमध्येही दुचाकी रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती शनिवारी जिल्हाभरात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यवतमाळ शहरासह दिग्रस, पुसद, घाटंजी, पांढरकवडासारख्या ठिकाणी यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले.यवतमाळ येथे माळीपुऱ्यातील शिवाजी चौकातील श्री शिवाजी मंडळ दरवर्षी तिथीनुसार शिवजन्मोत्सव साजरा करते. यंदाही ही परंपरा मंडळाने कायम राखली. संपूर्ण राज्यात दोनच ठिकाणी शिवजन्माचा पाळणा केला जातो. त्यामध्ये यवतमाळचा समावेश आहे. यंदा भल्या पहाटे शिवजन्म साजरा करून पाळण्यात नामकरण विधीही करण्यात आला. या ठिकाणी शनिवारी विश्व मांगल्य सभा पार पडली. यावेळी सई राम पंचभाई या बाल कीर्तनकाराने शिवजन्मोत्सवानिमित्त सुंदर कीर्तन सादर केले.शिवजयंतीनिमित्त मुलांसाठी पाच किलोमीटर आणि मुलींसाठी तीन किलोमीटर अंतराची दौड स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. प्रभातफेरीमध्ये आबालवृद्धांनी सहभाग घेतला. तर सायंकाळी शिवजयंतीची रॅली आयोजित करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गाने निघालेल्या या रॅलीमध्ये तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. भगवे फेटे घातलेले तरुण छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत होते. रॅलीतील शिवकालीन देखाव्यांनीही लक्ष वेधून घेतले. चंद्रकांत गड्डमवार यांच्या नेतृत्वात शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिवप्रेमी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी यात उत्साहाने सहभाग घेतला.यवतमाळप्रमाणेच दिग्रस येथेही दुचाकी रॅली काढण्यात आली. भगवे झेंडे घेतलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी लक्ष वेधून घेतले. घाटंजी, पांढरकवडा, पुसद येथेही विविध कार्यक्रम पार पडले. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज