‘जेडीआयईटी’त रासेयोतर्फे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 22:15 IST2017-08-20T22:15:38+5:302017-08-20T22:15:59+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात रासेयो पथकातर्फे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विविध वृक्षांचे रोपण केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड.ए.पी. दर्डा उपस्थित होते.

‘जेडीआयईटी’त रासेयोतर्फे वृक्षारोपण
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात रासेयो पथकातर्फे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विविध वृक्षांचे रोपण केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड.ए.पी. दर्डा उपस्थित होते. प्राचार्य डॉ.अविनाश कोल्हटकर, डॉ.संजय गुल्हाने, डॉ.पंकज पंडित आदींची उपस्थिती होती.
मान्यवरांनी वृक्षारोपण आणि संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. बेसुमार होत असलेली वृक्षतोड आणि धुरामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.अभय राठोड, सहकार्यक्रम अधिकारी प्रा.पीयूष हेबू, प्रा.कोमल पुरोहित, प्रा.आशीष माहुरे, प्रा.नितीन चव्हाण, प्रा.मयूर जिरापुरे, प्रा.विद्याशेखर, प्रा.सोनल सावरकर, प्रा.मोनाली इंगोले यांच्या मार्गदर्शनात रासेयो गटप्रमुख अश्विन वैद्य, मनीष कामावार, साहील पखाले, चार्मी भूत, पूनम लढ्ढा, हर्षल गोगल आदींनी पुढाकार घेतला.