कोवीड -१९ चा उपचार जन आरोग्य योजनेतून शिधापत्रिकेची अट शिथिल झाल्याने लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 05:00 IST2020-06-21T05:00:00+5:302020-06-21T05:00:41+5:30

सुरेंद्र राऊत। लोकमत न्यूज नेटवर्क कारोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून शासकीय रुग्णालया मोफत उपचार ...

Treatment of Kovid-19 Benefit from Jan Arogya Yojana due to relaxation of ration card condition | कोवीड -१९ चा उपचार जन आरोग्य योजनेतून शिधापत्रिकेची अट शिथिल झाल्याने लाभ

कोवीड -१९ चा उपचार जन आरोग्य योजनेतून शिधापत्रिकेची अट शिथिल झाल्याने लाभ

ठळक मुद्देजन आरोग्य योजनेत कोणते महत्वपूर्ण बदल झालेत ?

सुरेंद्र राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
कारोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून शासकीय रुग्णालया मोफत उपचार केला जात आहे. या योजनेच्या कक्षा रुंदावल्या असून केसरी शिधा पत्रिकाधारका प्रमाणेच श्वेत शिधा पत्रिकाधारकांना कोरोना सह विविध आजावर मोफत उपचार मिळत आहे. यावतमाळ जिल्ह्यात २० खासगी रुग्णालये अंगीकृत केलेली असल्याचे जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक सुरेंद्र इरपनवार यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधताना
सांगितले ...
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत कोणत्या आजारांवर उपचार ?
या योजनेमध्ये कोवीड -१९ सह १२० आजारावर उपचार केले जातात. केवळ कोरोना चा अपवाद सोडला तर आता इतर आजारांवर खासगी रुग्णालयात उपचार करता येतात. यामध्ये प्रामुख्याने गर्भ पिशवीचे आजार, हर्निया, प्रसूती व सिझेरिअन यासारखे ६७ आजार आहेत. ३१ जुलै २०२० पर्यंत आणखी आजाराच्या उपचाराचा योजनेत समावेश केला जाणार आहे. आता सध्या एकूण ९९६ आजारावर या योजनेतून मोफत उपचार करण्यात येत आहे.
जन आरोग्य योजनेअंतर्गत किती रुग्णालये अंगीकृत आहेत?
यवतमाळ जिल्ह्यात एकूण २० रुग्णालयात महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळतो.यात १४ खासगी व ६ शासकीय रुग्णालयांचा समावेश आहे.
जन आरोग्य योजनेत कोणते महत्वपूर्ण बदल झालेत ?
यापूर्वी योजनेचा लाभ फक्त केशरी, पिवळे, अंत्योदय, अन्नपूर्णा शिधापत्रीका धारकांना मिळत होता. आता पांढरे शिधा पत्रीकाधारक सुध्दा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. एखाद्याकडे शिधा पत्रीका नसेल तर तहसीलदारांच्या पत्रानुसार त्या रुग्णाला योजनेचा लाभ घेऊा येऊ शकतो. यामुळे रूग्णांची लाभार्थी संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातील रुग्णासोबतच शहरी रुग्णही योजनेचा मोठ्याप्रमाणात लाभ घेत आहेत.

अडचण असल्यास मदत तत्पर
जन आरोग्य योजनेचा लाभ घेणार रुग्ण हा अतिशय सामान्य घटक असल्याने त्याची प्रक्रिया अतिशय सुटसुटीत केली आहे. एखाद्या रुग्णाला अडचण असल्यास तो आरोग्य मित्राशी संपर्क करून आपली अडचण सोडवू शकतो. येथेही त्याचे समाधान झाले नाही तर टोल फ्री क्रमांक १५५३८८ आणि १८००२३३२२०० यावर संपर्क करून थेट वरिष्ठांकडून योजनेच्या लाभाबाबत मार्गदर्शन घेऊ शकतो. त्याच्या अडचणीची पुर्तता करण्यास मदत होते. जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून खुद्द जिल्हाधिकारी याजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतात.
 

Web Title: Treatment of Kovid-19 Benefit from Jan Arogya Yojana due to relaxation of ration card condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.