ट्रॅव्हल्स उलटून २१ प्रवासी जखमी
By Admin | Updated: July 1, 2014 23:42 IST2014-07-01T23:42:04+5:302014-07-01T23:42:04+5:30
चिंतामणीची पुणे ते चंद्रपूर ट्रॅव्हल्स पांढरकवडा मार्गावरील येरद वळणावर सकाळी ६ वाजता उलटली. या अपघातात चालक-वाहकासह २१ प्रवासी जखमी झाले असून तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.

ट्रॅव्हल्स उलटून २१ प्रवासी जखमी
येरदची घटना : तीन गंभीर
यवतमाळ : चिंतामणीची पुणे ते चंद्रपूर ट्रॅव्हल्स पांढरकवडा मार्गावरील येरद वळणावर सकाळी ६ वाजता उलटली. या अपघातात चालक-वाहकासह २१ प्रवासी जखमी झाले असून तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.
जखमींमध्ये प्रमोद गौरकार (४२), रा. चंद्रपूर, सुनील शंकर पाल (५०) रा. पुणे, हनुमान मदन दांडके (५८), आकाश रणवीर कुंभार, मधुकर रणवीर कुंभार, गोपाल कलाराम उमावंत, अमोल संभाजी सरोदे यांच्यासह २१ प्रवाशांचा समावेश आहे. पुणे येथून येणारी ट्रॅव्हल्स येरदजवळील वळणावर समोरुन येणाऱ्या ट्रकला वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्यावर उलटली. अपघाताची माहिती होताच नागरिक धाऊन आले. त्यांनी जखमी प्रवाशांना ट्रॅव्हल्स बाहेर काढले. तसेच इतर वाहनांनी त्यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. बहुतांश प्रवाशांच्या पायाला मार लागला आहे. (शहर वार्ताहर)