शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

बदल्या झाल्या, पण कार्यमुक्ती अद्याप अडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 05:00 IST

एका विभागातील कर्मचाऱ्याची दुसऱ्या विभागात विभागांतर्गत बदली करण्यात आली. या बदलीला आता १५ दिवसांचा कालावधी लोटून गेला तरी अद्याप बहुतांश कर्मचारी जुन्याच विभागात कार्यरत आहे. त्यांना विभाग प्रमुखांनी कार्यमुक्त केले नाही. बोटावर मोजण्याइतपतच कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले गेले. यामागे कोणते ‘गूढ’ लपले आहे, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : एकाच विभागात वर्षानुवर्षांपासून मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषद प्रशासनाने नुकत्याच कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात विभागांतर्गत कर्मचाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आला. मात्र आत्तापर्यंत केवळ मोजकेच कर्मचारी कार्यमुक्त झाले असून उर्वरितांनी अद्यापही जुन्याच विभागात मुक्काम ठोकला आहे.कोरोनामुळे यावर्षी बदल्या लांबल्या होत्या. मात्र शासन निर्देशानुसार गेल्या महिन्यात एकदाच्या बदल्या आटोपल्या. सर्वसाधारण बदल्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या करण्यात आल्या. शासनाने प्रशासकीय व विनंती अशा प्रत्येकी ७.५ टक्के बदल्या करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार १५ वर्षे एकाच ठिकाणी सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली होती. ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली गेल्याचे सांगितले जाते. अनेक कर्मचाऱ्यांनीही त्याताबाबत समाधान व्यक्त केले. नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ही प्रक्रिया पार पाडली.याचवेळी एकाच विभागात पाच वर्षे सेवा झालेल्या लिपीकवर्गीय आणि लेखावर्गीय कर्मचाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या. सामान्य प्रशासन, बांधकाम, सिंचन, शिक्षण, पाणीपुरवठा, वित्त, समाजकल्याण आदी विभागात पाच वर्षांपासून कार्यरत कर्मचाऱ्यांच्या यात समावेश आहे. एका विभागातील कर्मचाऱ्याची दुसऱ्या विभागात विभागांतर्गत बदली करण्यात आली. या बदलीला आता १५ दिवसांचा कालावधी लोटून गेला तरी अद्याप बहुतांश कर्मचारी जुन्याच विभागात कार्यरत आहे. त्यांना विभाग प्रमुखांनी कार्यमुक्त केले नाही. बोटावर मोजण्याइतपतच कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले गेले. यामागे कोणते ‘गूढ’ लपले आहे, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.काही विभाग प्रमुख आधी आपल्या विभागात बदलून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना रुजू होऊ द्या, नंतरच तुम्हाला कार्यमुक्त करू, असे बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना सांगत आहे. यामुळे बदली झालेले कर्मचारी कार्यमुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. दुसरीकडे बदली झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना आपला जुना विभाग सोडवेनासा झाला आहे. तेथे त्यांचे हितसंबंध गुरफटलेले आहे. विशेष म्हणजे काही पदाधिकारीच बदली झालेल्या काही कर्मचाऱ्यांना विभागातून जाऊ देण्यास तयार नाही, तर काहींना त्या विभागात येऊ देण्यास तयार नसल्याचे सांगितले जाते.सीईओंच्या भूमिकेकडे कर्मचाºयांचे लक्षबदली झालेल्या अनेक कर्मचारी नवीन विभागाच्या प्रतीक्षेत आहे. बांधकाम विभागातील मोजक्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले. सामान्य प्रशासन, वित्तसह अनेक विभागातील कर्मचारी कार्यमुक्तीच्या प्रतीक्षेतच आहे. यात नेमके कुणाचे हितसंबंध जुळले असावे, याबद्दल तर्कवितर्क लढविले जात आहे. त्यामुळे आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीच ‘खमकी’ भूमिका घेऊन बदली झालेल्या सर्व कर्मचाºयांना तातडीने कार्यमुक्त करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. असे जवळपास ५0 कर्मचारी कार्यमुक्तीच्या प्रतीक्षेत आहे.बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. अनेक कर्मचारी कार्यमुक्त होऊन नवीन ठिकाणी रुजू झाले. तथापि सोमवार, ७ सप्टेंबरला याबाबत सर्व विभाग प्रमुखांकडून आढावा घेणार आहे.- डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळमुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, यवतमाळ

टॅग्स :zpजिल्हा परिषदTransferबदली