शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कापूस खरेदीत व्यापाऱ्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 06:00 IST

शासकीय काम आणि बारा महिने थांब असाच अनुभव तूर आणि सोयाबीन खरेदीत शेतकऱ्यांच्या वाट्याला आला. यामुळे हमीदराने कापूस विक्री करतांना आपल्याला पैसे कधी मिळतील याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. शिवाय खरेदी झालेल्या कापसाचे पैसे बँक खात्यात जमा झाले तर हे पैसे बँका कर्जात वळते केले जातील याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या विड्रॉलवर स्वाक्षऱ्या : प्रती क्विंटल २०० ते २५० रूपयांचे कमीशन

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खुल्या बाजाराच्या तुलनेत कापसाचे शासकीय दर क्विंटलमागे ५०० रूपयाने अधिक आहे. हा नफा स्वत:च्या खिशात घालण्यासाठी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर कापूस विकणे सुरू केले आहे. यातून प्रती क्विंटलमागे २०० ते २५० रूपयांचा नफा व्यापारी मिळवित आहेत. यामुळे या योजनेचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच होत आहे.शासकीय काम आणि बारा महिने थांब असाच अनुभव तूर आणि सोयाबीन खरेदीत शेतकऱ्यांच्या वाट्याला आला. यामुळे हमीदराने कापूस विक्री करतांना आपल्याला पैसे कधी मिळतील याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. शिवाय खरेदी झालेल्या कापसाचे पैसे बँक खात्यात जमा झाले तर हे पैसे बँका कर्जात वळते केले जातील याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.कापूस घेऊन हमी केंद्रावर आलेल्या शेतकऱ्याला व्यापारी जाळ््यात ओढळतात. त्याला नगदी पैशाचे आमिष देऊन व्यवहार केला जातो. शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवसाचा धनादेश देऊन हमीदरापेक्षा कमी दरात सौदा करतात. शेतकऱ्यांनी हमी केंद्रावर विक्रीकरिता आणलेल्या कापूस विकण्याकरिता स्वत: जवळचा सातबारा देतात.पासबुकही दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांनी विकलेल्या कापसाचे पैसे त्याच खात्यात वळते होतात. शिवाय शेतकऱ्यांचा विड्रॉल कापूस विक्रीपूर्वीच घेतला जातो. यातून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते होताच हे पैसे व्यापाऱ्यांना मिळण्याचा मार्ग सुकर होतो. यातून शेतकऱ्यांना तत्काळ पैसे मिळाल्याचे समाधान होते. तर अशा अडचणीत अडकलेल्या शेतकऱ्यांचा फायदा घेत व्यापारी दररोज शेकडो क्विंटल कापसाची उलाढाल करतात.यातून व्यापारीच श्रीमंत होत आहे. शेतकऱ्यांसाठी हमीभाव योजना राबविली गेली, तो शेतकरी व्यवस्थेचा आणि गैर समजुतीचा बळी ठरतआहे.शेतकऱ्यांनो, व्यापाऱ्यांना सातबारा देऊ नकाकापूस खरेदी करताना व्यापारी गाव खेड्यातून सातबारा गोळा करत आहेत. या सातबारा मालकाकडून विड्रॉलचा ओटीजीएसही शेतमाल विकण्यापूर्वीच तयार करून घेत आहेत. यामुळे बँकेत पैसे जमा होताच ते पैसे व्यापाऱ्यांना वळते करता येतात. यातून व्यापारी मोठा होत आहे. त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना अडीअडचणीला सावकारी म्हणून व्यापारी मदत करणार आहेत. शेतकऱ्यांनी वेळीच जागृत होत ही योजना खऱ्या लाभार्थ्यांना मिळावी. खऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी असे सातबारा देण थांबविण्याची नितांत गरज आहे.शेतकºयांना आठ दिवसात चुकारे मिळण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. खात्यात जमा होणाऱ्या पैशातून कर्जाची रक्कमही वळती होणार नाही. शेतकऱ्यांनी आपले सातबारा व्यापाऱ्यांना देऊ नये. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आहे. व्यापाऱ्यांना मोठे करण्यासाठी नाही.- सुरेश चिंचोळकरपणन संचालक, यवतमाळ

टॅग्स :cottonकापूस