शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

आजपासून राज्यातील ४२ हजार शिक्षकांना घरबसल्या ‘अविरत’ प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 9:36 AM

विद्या प्राधिकरणातर्फे बुधवार २२ नोव्हेंबरपासून राज्यातील ४२ हजार ११४ शिक्षकांना मोबाईल अ‍ॅप आणि पोर्टलवर प्रशिक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदेशातील पहिला प्रयोग कर्मचाऱ्यांना ‘अपडेट’ करणारा प्रकल्पपहिल्या टप्प्यात ४० हजार शिक्षक सहभागी होतील

अविनाश साबापुरे।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : केवळ ‘कागद-पेन्सील’ अशा स्वरुपाच्या वारंवार होणाऱ्या सेवांतर्गत प्रशिक्षणाला विटलेल्या शिक्षकांसाठी आता ‘घरबसल्या’ प्रशिक्षणाची सोय झाली आहे. प्रशिक्षणासाठी पुणे किंवा जिल्हास्तरावर जाण्याचीही आता गरज उरलेली नसून यापुढे मोबाईल अ‍ॅप आणि पोर्टलवरच शिक्षकांना प्रशिक्षण घेता येणार आहे. तेही शासन म्हणते म्हणून नव्हे तर स्वत:ला गरज वाटते तेव्हाच!विद्या प्राधिकरणातर्फे बुधवार २२ नोव्हेंबरपासून राज्यातील ४२ हजार ११४ शिक्षकांना या प्रशिक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे. शिक्षकांना वर्षानुवर्षे दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचे स्वरुप आता बदलण्यात आले आहे. केवळ शासनाने लादलेले प्रशिक्षण म्हणून शिक्षकांना पुणे तसेच जिल्हास्तरावर हजर राहावे लागत होते. शिवाय, कागदोपत्री मिळालेले हे प्रशिक्षण नंतर किती शिक्षक प्रत्यक्ष अध्यापनात वापरत यावरही प्रश्नचिन्ह होते. त्यामुळेच आता प्रशिक्षण सतत देत राहण्यासाठी, शिक्षकांना त्यांच्या गावातच प्रशिक्षण मिळण्यासाठी ‘अविरत’ प्रशिक्षणाची संकल्पना पुढे आली.राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत अविरत प्रशिक्षणासाठी विद्या प्राधिकरणाने आदेश देण्याऐवजी शिक्षकांना आवाहन केले होते. प्रत्येक शाळेतून दोन शिक्षक आणि एक मुख्याध्यापक असे गृहित धरून पहिल्या टप्प्यात ४० हजार शिक्षक सहभागी होतील, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात ४२ हजारांपेक्षा जास्त शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी केली. या शिक्षकांना अविरत पोर्टल आणि मोबाईल अ‍ॅपद्वारे दहा दिवसांचे आॅनलाईन प्रशिक्षण मिळणार आहे. या दहा दिवसातील सुरवातीचे दोन दिवस ‘मास्टर ट्रेनर’च्या माध्यमातून तालुकास्तरावर प्रत्यक्ष माहिती दिली जाणार आहे. त्यानंतरचे आठ दिवसांचे प्रशिक्षण शिक्षकाला स्वत: आॅनलाईन घ्यावे लागणार आहे. प्रशिक्षण पूर्व आणि प्रशिक्षणानंतर सहभागी शिक्षकांचे आॅनलाईन मूल्यांकन होणार असून, त्याचे प्रमाणपत्रही तातडीने आॅनलाईनच मिळणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक मुख्याध्यापक व एक शिक्षक असे दोन मास्टर ट्रेनर तयार करण्यात आले आहेत. ३६ जिल्ह्यांतील ४०८ तालुक्यांसाठी ८३० मास्टर ट्रेनर निवडून त्यांना पुण्यात प्रशिक्षित करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातून ३२ तज्ज्ञ प्रशिक्षक निवडण्यात आले असून हे प्रशिक्षण निवडश्रेणी, वेतनश्रेणीकरिता उपयोगी ठरेल, अशी माहिती व्यवसाय मार्गदर्शन शिक्षक-समुपदेशक संघाचे अध्यक्ष किशोर बनारसे यांनी दिली.

नेटपॅकसाठी पैसे देणारअविरत प्रशिक्षण शिक्षकांना मोबाईल अ‍ॅप आणि अविरत पोर्टलवर घ्यायचे आहे. परंतु, राज्यात अनेक ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हीटीची समस्या असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे विद्या प्राधिकरणाकडून प्रशिक्षणार्थी शिक्षकांना नेटपॅकसाठी प्रत्येकी दीडशे रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या ४२ हजार शिक्षकांना अविरत पोर्टलचे वर्षभरासाठी मोफत सभासदत्वही दिले जाणार आहे.

टॅग्स :educationशैक्षणिक