शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

टिपेश्वर अभयारण्याचे धिंडवडे

By admin | Updated: May 27, 2015 02:22 IST

टिपेश्वर अभयारण्य हे नावालाच अभयारण्य उरले आहे. वन विभागाचे साधे जंगल टिपेश्वर अभयारण्यापेक्षा सुस्थितीत आहेत़

नरेश मानकर पांढरकवडाटिपेश्वर अभयारण्य हे नावालाच अभयारण्य उरले आहे. वन विभागाचे साधे जंगल टिपेश्वर अभयारण्यापेक्षा सुस्थितीत आहेत़ आर्थिक तरतुदीअभावी या अभयारण्याचे धिंडवडे निघत आहेत़ टिपेश्वरला अभयारण्याचा दर्जा देऊन इतिकर्तव्य संपले, अशी भूमिका घेऊन शासनाने अभयारण्याकडे पाठ फिरवली आहे़टिपेश्वर अभयारण्याकरिता शासनाने कोणतीही आर्थिक तरतूद केली नाही़ जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्यापूर्वी १० वर्षांचा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येतो़ त्यात दरवर्षी कोणती कामे करावयाची, याचे नियोजन करण्यात येते़ टिपेश्वरबाबत मात्र असे काहीही झाले नाही़ या अभयारण्याकरिता एक वन परीक्षेत्र अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे़ मात्र अभयारण्याचा सर्व कारभार नागपूर येथील पेंच व्याघ्र प्रकल्पातून चालविला जातो़ पेंच व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे शासनाचा सर्व निधी तेथेच खर्च करण्यात येतो. त्यामुळे या अभयारण्यात कोणतेही काम होत नाही़ येथील वन परीक्षेत्र अधिकाऱ्यांना प्रत्येक कामासाठी नागपूरला जावे लागते़ त्याचा प्रवास भत्ताही त्यांना वेळेवर मिळत नाही़ त्यामुळे कोणताही अधिकारी या अभयारण्यात यायला तयार नाही़ सुमारे १५ हजार हेक्टरवर पसरलेल्या या अभयारण्याच्या सुरक्षेसाठी केवळ २२ कर्मचारी कार्यरत आहेत़ त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही़ अभयारण्यात सिमेंट प्लग, नाल्यावर माती बांधाचे काम झालेले नाही़ त्यामुळे उन्हाळ्यात अभयारण्यात वन्य जीवांकरीता पाणी नसते़ पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी नागरी वस्तीत येतात आणि नागरिकांचा बळी घेतात़ नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या या अभयारण्यात विविध प्रकारचे दुर्मिळ वृक्ष आहेत़ वन औषधीही मोठ्या प्रमाणात आहेत़ जवळपास सात ते आठ पट्टेदार वाघांसह बिबट, रोही, रानगायी, कोल्हे, सारस, मोर, लांडोर आदी प्राणी व विविध प्रकारच्या पक्षांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे़ मात्र अलिकडच्या काळात अवैध वृक्ष तोड आणि वन्यप्राण्यांच्या शिकारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ गेल्या चार-पाच वर्षांत अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे या अभयारण्यातील तीन पट्टेदार वाघांचा मृत्यू झाला आहे.सुन्ना गावाजवळ एका पट्टेदार वाघाचा विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत्यू झाला, तर बोथ-बहात्तर गावाजवळ शिकाऱ्याच्या फासात अडकून एक पट्टेदार वाघ मृत्युमुखी पडला़ त्यानंतर अभयारण्यातील पिलखान नर्सरीजवळ एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. त्यामुळे या प्राण्यांची सुरक्षा करण्यास पेंच व्याघ्र प्रकल्प पूर्णत: अपयशी ठरल्याचे दिसत आहे. आंध्रप्रदेशाच्या सीमेपर्यंत पसरलेल्या या अभयारण्यात वन्यप्राण्यांची मोठ्या प्रमाणात शिकार केली जात आहे़ पैनगंगा नदी कोरडी पडल्यामुळे नदीतून वन्यप्राणी व मौल्यवान वृक्षांची तस्करी होत आहे. या अभयारण्याच्या चारही बाजूला वन चौक्या असल्या, तरी त्यात किती चौकीदार नियमित उपस्थित राहतात हा संशोधनाचा विषय आहे़ गेल्या काही वर्षात या अभयारण्यातील हजारो सागवान वृक्षांची कत्तल झाल्याचे उघडकीस आले. सागवान तस्करांवर वन कर्मचाऱ्यांनी गोळीबारही केला होता.१४ बिट, २२ अधिकारी, कर्मचारी कार्यरत टिपेश्वर अभयारण्याअंतर्गत एकूण १४ बिट आहेत. एक वन परीक्षेत्राधिकारी, चार राऊंड आॅफिसर, १४ वनरक्षक, तीन स्पेशल ड्युटी गार्ड व काही रोेजंदारी कामगार कार्यान्वीत आहेत़ या अभयारण्याचा संपूर्ण कारभार नागपूरवरून चालत असल्यामुळे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कुणाचेही नियंत्रण नाही़ वाघाचे अधिवास क्षेत्र असलेल्या या अभयारण्यातून मोठ्या प्रमाणात सागवान तस्करी होत असल्याचे उघडकीस आले असतानाही याकडे गंभीरतेने पाहिले जात नाही़त्यामुळेच अलीकडे अवैध वृक्षतोड व वन्यप्राण्यांच्या शिकारीत वाढ झाली आहे़ंसहायक वनसंरक्षकांचे कार्यालय आवश्यकवन्यजीव विभागाच्या सहायक वन संरक्षकांचे कार्यालय पांढरकवडा किंवा पाटणबोरी येथे होणे आवश्यक आहे़ तसे झाले, तर लहान-मोठ्या कामासाठी नागपूरकडे पाहात बसावे लागणार नाही़ उस्मानाबाद व बीड येथे अशी स्वतंत्र कार्यालये आहेत़ मुख्यत: अभयारण्याकररिता आर्थिक तरतूद होणे आणि तो निधी अभयारण्यातील वन्यप्राण्यांच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी खर्च होणे आवश्यक आहे़ त्यामुळे वन्यजीवांना आपली गरज भागविण्यासाठी अभयारण्याबाहेर पडण्याची वेळ येणार नाही. मात्र १५ वर्षांपेक्षा जादा कालावधी लोटूनही शासनाने या अभयारण्याकडे दुर्लक्षच केले आहे़ परिणामी येथील वन्यप्राण्यांची शिकार होत आहे़ त्याचप्रमाणे तालुक्याच्या वैभवात भर टाकणाऱ्या टिपेश्वर अभयारण्यात मौल्यवान वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याने निसर्गाचा अनमोल खजाना असलेल्या या अभयारण्याचे सौंदर्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे़