पांढरकवडा तालुक्यात अद्याप वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 05:00 AM2020-10-11T05:00:00+5:302020-10-11T05:00:11+5:30

तालुक्यातील कोपामांडवी, कारेगाव बंडल, अंधारवाडी, पाटणबोरी, कोबई, वारा कवठा शिवारात धुमाकूळ घालून शेतकरी, शेतमजुरांवर हल्ले करण्यासह त्यांची जनावरे फस्त करणाºया टीसी २ सी १ या वाघिणीने अंधारवाडी येथील एका महिलेवर हल्ला करून तिला ठार मारले होते. वाघिणीच्या सततच्या हल्ल्यामुळे तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर या वाघिणीस जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

Tiger terror in Pandharkavada taluka | पांढरकवडा तालुक्यात अद्याप वाघाची दहशत

पांढरकवडा तालुक्यात अद्याप वाघाची दहशत

googlenewsNext
ठळक मुद्देटिपेश्वरमधील वाघ अभयारण्याबाहेर । ऐन पीक काढणी हंगामात शेतकऱ्यांपुढे अडचण

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : टिपेश्वर अभयारण्यातीलवाघाची दहशत अद्यापही कायम असून शेतकऱ्यांच्या गुराढोरांवर सतत हल्ले होतच आहे. मागील महिन्यात नरभक्षक झालेल्या वाघिणीला जेरबंद केले असले तरी टिपेश्वर अभयारण्यातील इतर वाघ आता बाहेर येऊन शेतकºयांच्या गुरांवर हल्ला करित आहे.
तालुक्यातील कोपामांडवी, कारेगाव बंडल, अंधारवाडी, पाटणबोरी, कोबई, वारा कवठा शिवारात धुमाकूळ घालून शेतकरी, शेतमजुरांवर हल्ले करण्यासह त्यांची जनावरे फस्त करणाऱ्या टीसी २ सी १ या वाघिणीने अंधारवाडी येथील एका महिलेवर हल्ला करून तिला ठार मारले होते. वाघिणीच्या सततच्या हल्ल्यामुळे तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर या वाघिणीस जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. त्यानंतर परिसरात वाघाची दहशत संपुष्टात येईल, अशी अपेक्षा होती. परंतु टिपेश्वर अभयारण्यातील इतर वाघ आता बाहेर निघून शेतकऱ्यांच्या गुरांवर हल्ले करित आहे. गेल्या दोन दिवसात वाघाने गायी व गोºह्यावर हल्ला करून त्यांना ठार मारल्यामुळे पुन्हा वाघाची दहशत निर्माण झाली आहे. सध्या शेतकऱ्यांचा पीक काढण्याचा हंगाम असून सोयाबीन काढणे व कापूस वेचणीची कामे सुरू आहे. त्यांना त्यामुळे रोज शेतात जावे लागते. परंतु अभयारण्याला लागून असलेल्या शेतात शिरून वाघ केव्हा हल्ले करेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहे. चोपण शिवारात येत असलेल्या तलावावर वाघ पाणी पिण्यास येत असून शेतकऱ्यांच्या गुरांवर हल्ले करित आहे. त्यामुळे पशुपालकांत भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

कुंपनाची गरज
टिपेश्वर अभयारण्याला लागून मोठ्या प्रमाणावर शेती आहे. त्यामुळे या अभयारण्यातून बाहेर पडलेले वाघ शेतात येतात. त्यातून संघर्ष वाढत आहे. त्यामुळे वनविभागाने जंगलाला कुंपन घालावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Tiger terror in Pandharkavada taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.