उमर्डा नर्सरी परिसरात वाघाचे वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:03 IST2017-10-13T23:03:35+5:302017-10-13T23:03:48+5:30
शहरालगतच्या उमर्डा नर्सरी परिसरात दोन आठवड्यांपूर्वी वाघाचे वास्तव्य असल्याच्या खुणा आढळल्या. वन विभागाने वाघाची विष्ठा व पगमार्कचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे.

उमर्डा नर्सरी परिसरात वाघाचे वास्तव्य
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरालगतच्या उमर्डा नर्सरी परिसरात दोन आठवड्यांपूर्वी वाघाचे वास्तव्य असल्याच्या खुणा आढळल्या. वन विभागाने वाघाची विष्ठा व पगमार्कचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. या परिसरात पगमार्क आढळले, तेथे दहा ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहे.
उमर्डा नर्सरी पसिरात बिबटाचे अधूनमधून अनेकांना दर्शन झाले. आता या जंगलात वाघ असल्याच्या पाऊल खुणा मिळाल्या आहे. दोन आठवड्यांपूर्वी इचोरी शिवारात काही दिवसांच्या फरकाने तब्बल आठ जनावरांची शिकार झाली. काही जनावरे पूर्ण खालेल्ली, तर काही अर्धवट सोडून दिल्याचे आढळले. स्थानिक वनाअधिकाºयांची याची गंभीर दखल घेऊन वरिष्ठांना सूचना दिली. त्यावरून या परिसरात सर्च घेण्यात आला. त्यात जंगलात वाघाची ओली विष्ठा आढळली. काही भागात पगमार्कही आढळले.
उमर्डा नर्सरी परिसरात घनदाट जंगल आहे. शिवाय दोन तलाव लागूनच आहेत. त्यामुळे या परिसरात वाघ शिरण्याला दुजोरा मिळत आहे. वन विभागाचे सावध पवित्रा घेत आता ट्रॅप कॅमेरे लावले आहे. वाघाचा २४ तासातील अधिवास हा तब्बल ४० किलोमीटर परिसरात राहतो. त्यामुळे अद्याप वाघाचे नेमके ठिकाण निश्चित झाले नाही. ज्या भागात शिकार झाली, तेथे पगमार्क घेण्यासाठी खास पॅच तयार केले जाणार आहे. या जंगलात पट्टेदार वाघ वास्तव्यास आल्यास यवतमाळकरांसाठी पर्वणीच ठरणार आहे. मात्र स्थानिक ग्रामस्थांना अधिक सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतीक्षा
वाघाची विष्ठा वैद्यकीय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहे. पगमार्कही अभ्यासाठी तज्ज्ञांकडे दिले आहेत. त्याचा अहवाल मिळातच उमर्डा नर्सरी परिरात वाघाच्या वास्तव्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.