शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

ठगाने ६५ तरुणांना घातला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 05:00 IST

एसआयएस सिक्युरिटी कंपनीमध्ये २० हजार रुपये पगाराची नोकरी लावून देतो, असे म्हणत प्रकाश ऊर्फ जगदीश राठोड, रा. घुई, ता. नेर याने अनेकांना गंडा घातला. यात त्याने फसविलेल्या युवकांचाच बनावट कार्यालय उघडण्यासाठी वापर केला. प्रकाशने आर्णी तालुक्यातील मुलांना नोकरीचे आमिष दिले. त्यासाठी प्रत्येकी ६५ हजार जमा करण्यास सांगितले. चांगली नोकरी मिळणार या आशेवर ज्या पद्धतीने शक्य होईल तशी जुळवाजुळव करून बेरोजगारांनी प्रकाशच्या हातात पैसे ठेवले.

ठळक मुद्देस्वखर्चानेच उघडले कंपनी कार्यालय : अनेकांच्या सहभागाचा संशय

हरीओम बघेललोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : जिल्ह्यात सिक्युरिटी कंपनीमध्ये जाॅब लावून देतो, अशी बतावणी करून एका ठगाने ६५ जणांना गंडा घातला. सर्वसामान्य कुटुंबातील बेरोजगाराने घरातील किडूकमिडूक विकून पैसा उभा केला. काहींनी दुचाकी विकली, कुणी शेळ्या विकल्या. तर स्वखर्चानेच कंपनीचे कार्यालयही उघडले. ही आपबिती आर्णी येथील अजय ठाकरे याने ‘लोकमत’ला दिली. एसआयएस सिक्युरिटी कंपनीमध्ये २० हजार रुपये पगाराची नोकरी लावून देतो, असे म्हणत प्रकाश ऊर्फ जगदीश राठोड, रा. घुई, ता. नेर याने अनेकांना गंडा घातला. यात त्याने फसविलेल्या युवकांचाच बनावट कार्यालय उघडण्यासाठी वापर केला. प्रकाशने आर्णी तालुक्यातील मुलांना नोकरीचे आमिष दिले. त्यासाठी प्रत्येकी ६५ हजार जमा करण्यास सांगितले. चांगली नोकरी मिळणार या आशेवर ज्या पद्धतीने शक्य होईल तशी जुळवाजुळव करून बेरोजगारांनी प्रकाशच्या हातात पैसे ठेवले. प्रकाश यावरच थांबला नाही. त्याने बेरोजगारांनाच आर्णी शहरात एआयएस सिक्युरिटी कंपनीचे कार्यालय उघडण्यास सांगितले. तेथील टेबल खुर्चाही बेरोजगार युवकांनाच आणावयास लावल्या. व्हाॅट्सॲप ग्रुप बनवून प्रकाश सर्वांच्या संपर्कात राहत होता. दोन ते तीन महिने युवकांनी स्वखर्चाने कारभार चालवला. वेतनाची मागणी करताच प्रकाश उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यवतमाळात काही युवकांना डेमो म्हणून खासगी रुग्णालयांमध्ये नोकरीसुद्धा करायला लावली. यवतमाळातील कोल्हे लेआउट माईंदे चाैक येथे कार्यालय उघडले. तेथे नोकरीचे आमिष देऊन युवकांना ठेवण्यात आले. १९ जुलै रोजी त्याने अमोलकचंद काॅलेजच्या मैदानात ६५ युवकांना बोलावले. मात्र, तो स्वत: आलाच नाही. ज्या मोबाइल क्रमांकावरून प्रकाश संपर्कात होता ते मोबाइल नंबरही त्याने बंद करून टाकले. फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर सर्वांनाच जबर धक्का बसला. त्यानंतर आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

अवधूतवाडी पोलिसांनी नोंदविले बयाणबेरोजगारांना फसविणाऱ्या ठगाने कोल्हे लेआउटमधील एसआयएस सिक्युरिटी कंपनीचा पत्ता दिला होता. ही बाब तक्रारीत नमूद होती. त्यामुळे अवधूतवाडी पोलिसांनी गुरुवारी ठग प्रकाश राठोड याच्या संपर्कात असलेल्या सुपरवायझर व बाॅन्सर यांना पोलीस ठाण्यात पाचारण केले. त्यांच्याकडून पसार असलेल्या प्रकाश राठोड याचा काही सुगावा लागतो काय, या फसवणुकीच्या गुन्ह्यात कोणाकोणाचा समावेश आहे याचाही शोध पोलीस घेणार आहे. 

 

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिस