अंगावर दगड टाकून पत्नीचा निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 21:46 IST2017-08-12T21:45:49+5:302017-08-12T21:46:15+5:30
मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या अंगावर दगड टाकून पतीने खून केल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यानंतर पती घटनास्थळावरून पसार झाला.

अंगावर दगड टाकून पत्नीचा निर्घृण खून
सोनखास : मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या अंगावर दगड टाकून पतीने खून केल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यानंतर पती घटनास्थळावरून पसार झाला.
आशा प्रकाश लोणकर (३५) असे मृत पत्नीचे नाव आहे. आरोपी प्रकाश लोणकर (४०) याने मध्यरात्री १.३० वाजताच्या दरम्यान झोपेत असलेल्या पत्नीच्या छातीवर दगड घातला. यामुळे आशाने आरडाओरड केली. तेव्हा बाजूलाच झोपलेली तिची आई व भाऊ जागे झाले. हे पाहून प्रकाशने घटनास्थळावरून पळ काढला. आशा काही काळ तडपत होती. नंतर तिचा मृत्यू झाला. पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद होत असल्याचे सांगितले जाते. त्याने कोणत्या कारणातून आशाच्या छातीवर दगड टाकला, हे मात्र अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी आशाचा भाऊ अमोल दशरथ कोमटी याने दिलेल्या तक्रारीवरून लाडखेड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
आशाचा पती प्रकाश गेल्या पाच वर्षांपासून सासºयाकडेच घरजावई म्हणून राहात होता. त्याचे मूळ गाव बाभूळगाव तालुक्यातील यावली असून तो पत्नी व दोन मुलींसह उत्तरवाढोणा येथे सासुरवाडीला राहण्यासाठी आला होता.