तरुणाचा गळा चिरुन खून

By Admin | Updated: January 23, 2017 01:02 IST2017-01-23T01:02:27+5:302017-01-23T01:02:27+5:30

उमरखेड येथील तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरुन खून केल्याची घटना रविवारी दुपारी तालुक्यातील बेलगव्हाण घाटात उघडकीस आली.

The throat slit and throat | तरुणाचा गळा चिरुन खून

तरुणाचा गळा चिरुन खून

बेलगव्हाणची घटना : मारेकरी अज्ञात
पुसद : उमरखेड येथील तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरुन खून केल्याची घटना रविवारी दुपारी तालुक्यातील बेलगव्हाण घाटात उघडकीस आली. खुनाचे कारण आणि आरोपींचा मात्र थांगपत्ता लागला नव्हता.
युवराज धनराज मस्के (३०) असे मृताचे नाव आहे. रविवारी जंगल गस्तीवर असलेल्या वनरक्षकाला रस्त्यालगत तरुणाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यांनी पुसद ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्याची ओळख पटविली असता तो उमरखेड येथील युवराज मस्के असल्याचे पुढे आले. अज्ञात मारेकऱ्यांनी त्याचा गळा चिरुन खून केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे मृतदेहापासून काही अंतरावर दुचाकीही आढळून आली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अज्ञात मारेकऱ्यांचा शोध जारी केला आहे. युवराज हा उमरखेड पंचायत समितीचे सेवानिवृत्त चालक धनराज मस्के यांचा मुलगा होता. पुसद ग्रामणी पोलिसांनी आरोपींचा शोध जारी केला आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: The throat slit and throat