दुचाकी दुभाजकावर आदळून तीन तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST2019-11-27T06:00:00+5:302019-11-27T06:00:24+5:30

योगेश बळवंत नेवारे (३०), महेश अरुण दोनोडे (२८) दोघे रा. मोठे वडगाव, भारत कवडू चौधरी (३५) रा . हिवरी अशी अपघातातील मृतांची नावे आहे. यातील योगेश व महेश हे दोघे वडगावच्या सुभाष क्रीडा मंडळातील कबड्डीचे खेळाडू होते. त्यांची भारत सोबत मैत्री होती. भरत हा एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये चालक होता.

Three youths killed in two-wheeler crash | दुचाकी दुभाजकावर आदळून तीन तरुण ठार

दुचाकी दुभाजकावर आदळून तीन तरुण ठार

ठळक मुद्देआर्णी मार्गावरील थरार : विरुद्ध दिशेने जात असल्याने अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरी: येथील आर्णी मार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सोमवारी रात्री मोठे वडगाव परिसरातील तीन तरुण दुचाकीने हिवरीकडे जात होते. दरम्यान अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर दुभाजकावर दुचाकी आदळून हा भीषण अपघात झाला. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
योगेश बळवंत नेवारे (३०), महेश अरुण दोनोडे (२८) दोघे रा. मोठे वडगाव, भारत कवडू चौधरी (३५) रा . हिवरी अशी अपघातातील मृतांची नावे आहे. यातील योगेश व महेश हे दोघे वडगावच्या सुभाष क्रीडा मंडळातील कबड्डीचे खेळाडू होते. त्यांची भारत सोबत मैत्री होती. भरत हा एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये चालक होता. सोमवारी रात्री भरतला हिवरी येथे सोडण्यासाठी योगेश व महेश दुचाकीने निघाले. योगेशच्या दुचाकीवर तिघेजण बसून हिवरीकडे जात होते. दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे बऱ्याचदा रस्ता कधी एका बाजूने बंद केला जातो. यातच या युवकांची फसगत झाली. रस्ता बंद असल्याचे समजून ते विरुद्ध दिशेने हिवरीकडे निघाले. अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर दुभाजकाला जोरदार दुचाकीची धडक बसली. यात तिघेही रस्त्यावर आदळले. डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्राव होऊन तिघांचा मृत्यू झाला.
ही घटना रात्री ११ वाजता दरम्यान माहीत झाली. मात्र तोपर्यंत या तिघांपैकी एकही जण जीवंत नव्हता. त्यांना ग्रामीण पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर शवविच्छेदन गृहात मृतदेह ठेवण्यात आले. सकाळी तिघांचेही शवविच्छेदन झाले. या घटनेने मोठे वडगाव परिसरात एकच शोककळा पसरली. कबड्डीचे खेळाडू अचानक गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

बराच वेळ घटनास्थळावर पडून
अपघात झाल्यानंतर तिघेही बराच वेळ घटनास्थळावर पडून होते. किन्हीजवळ एका व्यक्तीचा रानडुक्कर आडवा आल्याने अपघात झाला. त्याला घेऊन किन्हीतील नागरिक यवतमाळकडे येत असताना त्यांना भीषण अपघाताचे दृश्य दिसले. त्यांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळावर मदत पोहोचली. तोपर्यंत उशीर झाला होता.

Web Title: Three youths killed in two-wheeler crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात