शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 
3
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
4
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
5
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
6
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
7
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
8
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
9
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
10
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
11
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
12
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
13
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
14
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
15
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
16
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
17
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
18
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
19
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
20
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...

यवतमाळ जिल्ह्यात तिघांचा मृत्यू ; ११७ नव्याने पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 8:03 PM

गेल्या २४ तासात जिल्ह्यात तीन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला तर ११७ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ७३ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: गेल्या २४ तासात जिल्ह्यात तीन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला तर ११७ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ७३ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.मृत झालेल्या तीन जणांमध्ये आर्णी तालुक्यातील ५० वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील २४ वर्षीय पुरुष आणि दिग्रस शहरातील 60 वर्षीय पुरुष आहे. तर नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 117 जणांमध्ये 75 पुरुष असून 42 महिलांचा समावेश आहे. यात आर्णी शहरातील दोन पुरुष व दोन महिला, दिग्रस शहरातील नऊ पुरुष व चार महिला, दारव्हा तालुक्यातील एक महिला, घाटंजी शहरातील दोन पुरुष व चार महिला, कळंब शहरातील दोन पुरुष, महागाव शहरातील एक महिला, महागाव तालुक्यातील एक महिला, नेर शहरातील सात पुरुष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील दोन पुरुष, पुसद तालुक्यातील तीन पुरुष, राळेगाव तालुक्यातील एक पुरुष, उमरखेड तालुक्यातील दोन पुरुष, वणी शहरातील 10 पुरुष व 13 महिला, यवतमाळ शहरातील 34 पुरुष व 13 महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष व एक महिलेचा समावेश आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात 966 अ‍ॅक्टिव्ह पॉझेटिव्ह असून होम आयसोलेशनमध्ये 315 जण आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 4664 झाली आहे. यापैकी 3255 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 127 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 284 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने बुधवारी 135 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 57833 नमुने पाठविले असून यापैकी 54512 प्राप्त तर 3321 अप्राप्त आहेत. तसेच 49848 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस