अमरावती-यवतमाळ मार्गावर तीन तासापासून वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:18 IST2019-09-19T12:18:12+5:302019-09-19T12:18:54+5:30
येथून अमरावतीकडे जाणाऱ्या मार्गावर लासीनानजीक गुरुवारी सकाळी सुमारे तीन तासांपासून वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे अमरावतीला परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी, विद्यापीठात बैठकीला जाणारे शिक्षक आणि अपडाऊन करणारे शासकीय कर्मचारी अडकून पडले आहेत.

अमरावती-यवतमाळ मार्गावर तीन तासापासून वाहतूक ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ - येथून अमरावतीकडे जाणाऱ्या मार्गावर लासीनानजीक गुरुवारी सकाळी सुमारे तीन तासांपासून वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे अमरावतीला परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी, विद्यापीठात बैठकीला जाणारे शिक्षक आणि अपडाऊन करणारे शासकीय कर्मचारी अडकून पडले आहेत. यवतमाळपासून पाच किलोमीटर अंतरावर लासीना गावानजीक दोन दिवसांपूर्वी सिमेंटने भरलेला ट्रक पलटी झाला होता. गुरुवारी सकाळी हा ट्रक क्रेनद्वारे काढण्याचे काम सुरू होते. हा ट्रक व क्रेन रस्त्यात आडवे झाल्याने अमरावती व यवतमाळ या दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली. सुमारे तीन तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवाशांनी या वाहतूक कोंडीची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. मात्र कुणीही पोलीस पथक घटनास्थळी आले नसल्याची प्रवाशांची ओरड आहे. अनेक विद्यार्थ्यांना या वाहतूक कोंडीमुळे अमरावतीच्या परीक्षेला मुकावे लागेल तर बैठकीसाठी जाणारे शिक्षक, शासकीय कर्मचारी यांना विलंबाचा फटका बसेल.