करळगाव घाटात तीन बसेस फेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 09:47 PM2019-04-19T21:47:39+5:302019-04-19T21:48:00+5:30

एसटी बसमध्ये उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या तांत्रिक बिघाडाकडे यंत्र विभागाचे दुर्लक्ष सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी करळगाव घाटात तीन बसेस ब्रेकडाऊन झाल्या. यातील प्रवाशांना उन्हात उभे राहून दुसºया बसची प्रतीक्षा करावी लागली.

Three buses failed in Karalgaon Ghat | करळगाव घाटात तीन बसेस फेल

करळगाव घाटात तीन बसेस फेल

Next
ठळक मुद्देप्रवाशांचे हाल : उन्हाळ्यातील तांत्रिक बिघाडांकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एसटी बसमध्ये उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या तांत्रिक बिघाडाकडे यंत्र विभागाचे दुर्लक्ष सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी करळगाव घाटात तीन बसेस ब्रेकडाऊन झाल्या. यातील प्रवाशांना उन्हात उभे राहून दुसºया बसची प्रतीक्षा करावी लागली. पिंपळगाव बायपासजवळसुद्धा एक बस फेल झाली होती.
उन्हाळ्यामुळे बसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. शिवाय जादा बसेस सोडल्या जात आहे. या बसेस तंदुरुस्त असाव्या अशा सूचना मध्यवर्ती कार्यालयाने यंत्र विभागासह विभाग नियंत्रकांना केल्या आहे. मात्र यवतमाळ विभागात याकडे सोयिस्कर दुर्लक्ष होत आहे. मार्गात बसेस बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
शुक्रवारी बाभूळगावहून यवतमाळकडे निघालेल्या चार बसेस करळगाव घाट ते पिंपळगाव बायपासपर्यंत फेल पडल्या होत्या. फेल पडण्याची विविध कारणे सांगितली जात आहेत. पिंपळगावजवळ बंद पडलेल्या एम.एच.४०/एन-९५४५ या क्रमांकाच्या बसचे रेडिएटर हीट झाल्याचे सांगण्यात आले. करळगाव घाटात सकाळी १० वाजता बंद पडलेल्या एम.एच.०६/एस-८९३९ या बसच्या ब्रेकमध्ये बिघाड निर्माण झाला होता. तिसरी चांदूररेल्वे आगाराची बस सकाळी घाटात नादुरुस्त झाली. दुरुस्तीसाठी कुणीही न पोहोचल्याने दुपारी १२.३० च्या सुमारास चालकाने हिम्मत करून परत नेली.
नादुरुस्त झालेल्या बसविषयी माहिती देऊनही यंत्र विभागाची यंत्रणा तत्काळ पोहोचत नसल्याचा अनुभव चालक-वाहकांना येत आहे. विशेष म्हणजे, यवतमाळ विभागाचे विभाग नियंत्रक म्हणून जबाबदारी पार पाडत असलेले अधिकारी यंत्र अभियंता आहे. तरीही लालपरीचे हाल सुरू आहे. यात प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Three buses failed in Karalgaon Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.