लॉटरी दुकानातून साडेतीन लाख रुपये चोरणाऱ्या चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:36 IST2018-05-28T00:36:12+5:302018-05-28T00:36:12+5:30
स्थानिक मार्इंदे चौकातील लॉटरी दुकानात चोरीची घटना घडली. याप्रकरणाची माहिती मिळताच टोळी विरोधी पथकाने आरोपींचा घेऊन चारही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून चोरीचे तीन लाख ८० हजार रूपये जप्त करण्यात आले.

लॉटरी दुकानातून साडेतीन लाख रुपये चोरणाऱ्या चौघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक मार्इंदे चौकातील लॉटरी दुकानात चोरीची घटना घडली. याप्रकरणाची माहिती मिळताच टोळी विरोधी पथकाने आरोपींचा घेऊन चारही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून चोरीचे तीन लाख ८० हजार रूपये जप्त करण्यात आले.
राजेंद्र जयस्वाल यांच्या लॉटरी दुकानातून मंगळवारी सकाळी ११ वाजता तीन लाख ८० हजार रुपयांची चोरी झाली. ही तक्रार शनिवारी दुपारी देण्यात आली. तक्रार होण्यापूर्वीच टोळी विरोधी पथकाने गोपनीय माहितीवरून चार संशयीतांना ताब्यात घेतले. गुन्ह्याची कबुली व रोख रक्कम हाती येताच या प्रकरणी तक्रार दाखल झाली. यामध्ये फेरबदल करून ही घटना २६ मे रोजी झाल्याचे दाखविण्यात आले.
पोलिसांच्या प्रेसनोटमध्ये मात्र आरोपी रुपेश बाबाराव गजलवार ऊर्फ रुपेश टावर याच्याकडून दोन लाख ६३ हजार ६०० रुपये आणि गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केल्याचे दर्शविण्यात आले.
अंकुश नारायण येटरे याच्याकडून रोख ५० हजार, चंद्रकांत देवानंद राऊत याच्याजवळून रोख १० हजार, अतुल ऊर्फ नीलेश दयाप्रसाद तिवारी याच्याजवळून रोख २० हजार, असे तीन लाख ४३ हजार रूपये आणि गुन्ह्यात वापरलेले चाकू, मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपींना अवधूतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.