शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कचेरी बॉम्बने उडविण्याची धमकी

By admin | Updated: January 19, 2017 00:53 IST

येथील जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने बुधवारी सर्वत्र एकच खळबळ उडाली.

पत्राने खळबळ : बॉम्बशोध पथकाने केली तपासणी यवतमाळ : येथील जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने बुधवारी सर्वत्र एकच खळबळ उडाली. दिवसभर बॉम्ब शोधक पथकाने तपासणी करून बॉम्ब नसल्याची खात्री केल्यानंतरच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. बुधवारी नियमित कामकाज सुरू असतानाच एक पत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती पडले. पत्रात जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मजकूर होता. त्यांनी लगेच पोलीस व बॉम्बशोध पथकाला पाचारण केले. बॉम्बशोध पथक, पोलीस कमांडोज, पोलीस, गोपनीय शाखेच्या कर्मचाऱ्यांचा ताफा दुपारी १:३० वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला. क्षणार्धात जिल्हा कचेरीचा संपूर्ण परिसरच सील करण्यात आला. पोलिसांनी सर्व कार्यालये ताब्यात घेतली. डॉग स्कॉडही सोबत होते. सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांचा कक्ष तपासण्यात आला. नंतर त्यांचे वाहन तपासले. संपूर्ण कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढून परिसराची तपासणी करण्यात आली. परिसरातील वाहनेही बाहेर रस्त्यावर काढण्यात आली. आत जाणाऱ्या व्यक्तींची कसून तपासणी सुरू झाली. यामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती. या कार्यालयात दररोज शेकडो नागरिक हजेरी लावतात. तसेच हे कार्यालय मोर्चा, निवेदन, उपोषण आणि आंदोलनाचे केंद्रबिंदू असते. कार्यालयात येणाऱ्यांची वर्दळ सतत सुरू असते. बुधवारीसुद्धा अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शेकडो नागरिक या परिसरात होते. शहरातील एका वृत्तपत्र कार्यालयातील डाकेत हे संशयीत पत्र आले होते. पत्रात ‘जिल्हाधिकारी कार्यालय १८ जानेवारी २०१७ ला बॉम्बने उडविणार’, एवढाच मजकूर लिहेलेला होता. पत्राखाली ‘एका समाज संघटनेचे नाव लिहिण्यात आले आहे. (शहर वार्ताहर) पोलिसांचा खडा पहारा धमकी पत्राची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली. लगेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी दोनही मुख्य दारे पोलिसांनी बंद केली. तेथे पोलीस तैनात करण्यात आले. १०० पोलीस, १५ उपनिरीक्षक आणि सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस कमांडोज, बॉम्बशोधक पथक, क्युआरटी युनिट आणि आरसीटीचे पथक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. यामुळे या परिसरात बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती.